शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे संकट वाढणार; कापूस खरेदीला अटींचा फास!

By सुनील चरपे | Updated: August 30, 2025 13:16 IST

सीसीआयला हवा केवळ ८ ते १० टक्के ओलसरपणा : सीसीआय ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एमएसपीपेक्षा ३०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खुल्या बाजारात कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहेत. कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने कापसाचे दर आणखी दबावात आले. त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस विकण्यास प्राधान्य देणार आहे. सीसीआयला कापसात ८ ते १० टक्के ओलावा हवा असतो तर सुरुवातीच्या कापसात किमान १६ ते २० टक्के ओलावा आढळून येतो. अशा परिस्थितीत सीसीआय ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एमएसपीपेक्षा ३०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या वर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ६,५०० ते सात हजार रुपयांच्या आसपास राहणार आहेत. सीसीआयला कापसात ८ ते १० टक्के ओलावा हवा असतो. कापसातील ओलावा माती आणि हवामानावर अवलंबून असतो. पहिल्या दोन वेच्याच्या कापसात ओलाव्याचे प्रमाण किमान १४ ते १६ टक्के आढळून येते. हा ओलावा कमी करण्यासाठी कुठलेही कृत्रिम साधन नसल्याने किमान डिसेंबर ते जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. शेतकऱ्यांना तोपर्यंत कापूस रोखून धरणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ओलाव्याच्या टक्केवारीनुसार कापसाचे दर कमी करते किंवा अतिरिक्त अथवा लांब धाग्याचा कापूस मध्यम धाग्याचा असल्याचे दाखवून दर कमी करते. अधिक ओलावा कमी दर आणि कमी ओलावा-अधिक दर असे सीयीआयच्या कापूस खरेदीचे सूत्र असल्याने ते याही वर्षी कायम राहणार आहे.

नुकसान दाखवणार, भरपाई मागणारसीसीआयने देशात कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करीत जिनिंग-प्रेसिंग १ किरायाने घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. जिनिंग मालकांसोबत करार करून खरेदी सुरू करण्यासाठी त्यांना किमान दोन महिने लागणार आहेत. सीसीआय लांब धाग्याचा कापूस मध्यम धाग्याच्या कापूस दरात खरेदी करेल आणि त्यांचे नुकसान टाळेल.दुसरीकडे वजनातील घट, अधिक दर व तत्सम बाबी दाखवून कापूस खरेदी तोटा झाल्याचे दाखवेल आणि केंद्र सरकारला नुकसानभरपाई मागण्याची शक्यता बळावली आहे.

३०० लाख गाठी कापूस खरेदी करणार काय ?सीसीआयने सन २०२४-२५ च्या हंगामात देशभरात १०० लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. या वर्षी कापसाचे दर एमएसपीपेक्षा किमान एक हजार ते १,२०० रुपयांनी कमी राहणार असल्याने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सीसीआयला कापूस विकणार आहे.देशात ३०० लाख गाठींपेक्षा अधिक कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे सीसीआय एमएसपी दराने किमान ३०० लाख गाठी कापूस खरेदी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

कापसाची एमएसपीलांब धागा - ८,११० रुपये.मध्यम लांब धागा - ७,७१० रुपये.

कापसातील ओलावाऑक्टोबर ते नोव्हेंबर - १२० ते १६ टक्केनोव्हेंबर ते डिसेंबर - १४ ते १२ टक्केजानेवारी ते फेब्रुवारी - १२ ते १० टक्केमार्च ते एप्रिल - १० ते ८ टक्के

ओलावानिहाय दर (शक्यता)८ टक्के - ८,११० रुपये९ टक्के - ८,०३४ रुपये१० टक्के - ७,९३४ रुपये१२ टक्के - ७,८०३ रुपये

टॅग्स :nagpurनागपूरcottonकापूसFarmerशेतकरीfarmingशेती