शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पेरण्या खोळंबल्या; चांगल्या पावसाची प्रतिक्षा

By गणेश हुड | Updated: June 29, 2024 18:12 IST

जिल्ह्यात ४३ टक्के पेरण्या : दुबार पेरण्याच्या धोक्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह नागपूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या, मात्र आता पिके जगविण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन पेरण्या केल्या आहे. चांगला पाऊस नसल्याने केलेली पेरणी उलटण्याची धोका असल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात जेमतेम ४३.५९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुका वगळता इतर कुठल्याही तालुक्यात २९ जूनपर्यंत पावसाने सरासरी गाठलेली नाही. जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला आहे.  त्यामुळे कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्हयातील एकूण ४ लाख ६५ हजार ३२७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख २ हजार ८१३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यात कपाशीच्या एकुण २ लाख १६ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २३ हजार ८०९ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनच्या ९५ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रापैकी ५२ हजार ६८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तूर ५२ हजार २९३ हेक्टर पैकी २५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. भाताच्या पिकासाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने ९४ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त २३९ हेक्टर क्षेत्रात लावणी झाली आहे.

तीन तालुक्यात १०० मि.मी पाऊस नाहीजिल्ह्यातील रामटेक, पारशिवणी व सावनेर तालुक्यात अनुक्रमे ९१.२ मि.मी., ७४.५ व ६९.४ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात अद्याप १०० मि.मी. पाऊस झालेला नाही. तर नरखेड व काटोल तालुक्याने सरासरी ओलांडली असून अनुक्रमे १५७.३ मि.मी. व १७५.१ मि.मी पाऊस झाला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                

जिल्ह्यातील प्रमुख पिकाखालील क्षेत्र(हेक्टर) व झालेली पेरणीपिक            एकूण क्षेत्र               झालेली पेरणी                टक्केवारीकापूस            २१६३६१                 १२३८०९                      ५७.२२सोयाबीन         ९५५९५                  ५२६२१                       ५५.२५तूर                  ५२, २९३                 २५३०७                       ४८.३९भात                ९४५९४                   २३९                             ०.२५

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर