शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

२५ गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:31 IST

पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देपोहराचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून थांबवा शेतकऱ्यांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.संघर्ष जगण्याचा जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आदी २० ते २५ गावातील शेतीचे सिंचन होते. येथील ८० टक्के शेती पोहरा नदीच्या पाण्यावर होते. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून पाणी भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. शुद्ध केलेले २०० एमएलडी पाणी खापरखेडा येथील विद्युत निर्मिती केंद्राला पुरविण्यात येणार असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते. पाणी शुद्ध करण्याला विरोध नाही. परंतु, शुद्ध केल्यानंतर ते पाणी पुन्हा पोहरा नदीत सोडावे किंवा पोहरा पंपिंग हाऊस विहीरगावच्या बाजूच्या स्मॉल वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करावा, विद्युत प्रकल्पाला पुरविण्यात येणारे २०० एमएलडी पाणी रद्द करावे व नदीचे खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवावी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र नारे-निदर्शने करून १०० शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण केले. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, हुकुमचंद आमदरे, रमेश जोध, सुरेश वर्षे, आशिष मल्लेवार वामन येवले, मनोहर कोरडे, तापेश्वर वैद्य, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, राजेश ठवकर, क्रिष्णा शहाणे, दिनेश ढोले, अतुल बाळबुधे, प्रेम चांभारे, अमोल चांभारे, श्रीहरी देवगडे, संजय गावंडे, मदन गोमकर, मनोहरजी शहाणे, विलास मोहड, माणिक खेटमले, अमोल मोहड, केवल फळके आदींचा समावेश होता.५ ऑगस्टपर्यंत पोहरा नदीचे पाणी शेतकऱ्यांना देण्याविषयी निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी