शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 19:02 IST

आॅनलाईन लोकमतनरखेड : सततची नापिकी, वाढते कर्जबाजारीपण आणि कर्ज परतफेडीची चिंता याला कंटाळून शेतकऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना नरखेड तालुक्यातील नरखेड -अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ गुरुवारी रात्री घडली. मृत शेतकरी हा माणिकवाडा (ता. नरखेड) येथील रहिवासी आहे.सुरेश नारायणराव डवरे (६७, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) असे ...

ठळक मुद्देधावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

आॅनलाईन लोकमतनरखेड : सततची नापिकी, वाढते कर्जबाजारीपण आणि कर्ज परतफेडीची चिंता याला कंटाळून शेतकऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना नरखेड तालुक्यातील नरखेड -अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ गुरुवारी रात्री घडली. मृत शेतकरी हा माणिकवाडा (ता. नरखेड) येथील रहिवासी आहे.सुरेश नारायणराव डवरे (६७, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश डवरे यांच्याकडे ३.२१ हेक्टर आर शेती असून, त्यातील काही ओलिताची तर काही कोरडवाहू शेती आहे. त्यांनी अलाहाबाद बँकेच्या नरखेड शाखेकडून तीन वर्षांपूर्वी तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने ते कर्ज थकीत राहिले. यावर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. सुरेश डवरे यांनीही कर्जमाफीचा अर्ज भरला होता. शिवाय, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु, त्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नव्हते. त्यातच यावर्षी त्यांना थोडेफार बरे पीक होऊनही अल्प बाजारभाव मिळाला. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याची माहिती त्यांच्या पत्नी शोभा डवरे यांनी दिली.त्यातच ते गुरुवारी दुपारी शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला असता, नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पत्नी शोभा डवरे यांच्यासह कुटुंबीयांनी दिली. दुसरीकडे, राज्य शासनाने मृत सुरेश डवरे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्याकडील कर्ज माफ करावे, अशी मागणी माणिकवाड्याच्या सरपंच सुनीता डवरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या