शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:49 IST

एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.

ठळक मुद्देअजित पवार यांनी काढला चिमटा : प्राधान्य कशाला, सरकारनेच स्पष्ट करावे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत प्रचारासाठी जात असताना नागपुरात पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आज आत्महत्या करणारे शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहित आहेत. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीद्वारे सांगत आहे. हे एकप्रकारचे भाजप-शिवसेना सरकारचे अपयश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत विचारले असता पवार यांनी सांगितले की, स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडला. राजकारणात काही लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात तर काही जण निष्ठा पाळणारे असतात. त्यामुळे ते चालतच राहते. नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबत त्यांना विचारले असता अधिवेशन कुठे घ्यावे, हा सरकारचा अधिकार आहे. त्याला आपला पाठिंबा राहील. सरकारला जाब विचारण्याचे आमचे काम आहे, अधिवेशन कुठेही झाले तरी ते आम्ही करूच, असेही त्यांनी स्पषट केले.मित्रपक्षासोबत भाजपाची वागणूक चांगली नाही. राजू शेट्टी नाराज आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील बातम्या पाहता शिवसेनाही नाराज असल्याचे दिसून येते. विनायक मेटे यांना अजूनही मंत्री करण्यात आले नाही. एकूणच गाजर दाखविण्यात येत असल्याने नाराज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आणि आ. प्रकाश गजभिये उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूर