शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:36 IST

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकशी तुटणार कोरोनाची साखळी? : ‘हायरिस्क’ व ‘लोरिस्क’ संपर्कातील लोकांपर्यंत पोहचले जात नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे. अपुऱ्या यंत्रणामुळे अनेक बाधितांच्या संपर्कातील लोकांची चाचणी होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत या महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात कमालीची वाढ झाली आहे. दोन हजारावर गेलेली रुग्णसंख्या आता १२०० वर आली आहे. परंतु मृत्यूची संख्या अद्यापही ४० ते ५० दरम्यान असल्याने कोरोनाची दहशत कायम आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित कोरोनाबाधितांची चाचणी होणे, पॉझिटिव्ह आल्यास उपचाराखाली आणणे, रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या म्हणजे ‘हायरिस्क’ व दुरून संपर्क आलेला म्हणजे ‘लो रिस्क’ नागरिकांचा शोध घेणे आवश्यक असते. यात साधारण १३ ते २० लोकांची तपासणी करणे अपेक्षित असते. सोबतच रुग्णांच्या परिसरात सर्वेक्षण करणे गरजेचे असते. मात्र, ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नसून बोजवारा उडल्याचे चित्र आहे. -मुंढे यांच्या काळात ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’वर होता जोर तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कार्यरत असताना त्यांनी ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षणावर विशेष भर दिला होता. परंतु त्यांची बदली होताच आता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे खुद्द रुग्णांचे म्हणणे आहे.नाव लिहून घेतले परंतु संपर्कच केला नाहीएका कोरोनाबाधित रुग्ण महिलेने ‘लोकमत’ला सांगितले, पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. स्वत:हून कोविडची तपासणी केली. तपासणीनंतर दोन दिवसाने मनपाकडून फोन आला. त्यांनी पत्ता विचारून घराला भेट दिली. कोणकोण संपर्कात आले यांची नावे लिहून घेतली. घराला स्टीकर लावले. परंतु नंतर काहीच केले नाही.ट्रेसिंगची आकडेवारी देण्यास टाळाटाळशहरात आतापर्यंत किती लोकांचे ट्रेसिंग केले याची माहिती मनपाच्या संबंधित विभागाला मागितली असता मागील दोन आठवड्यापासून टाळटाळ करीत आहे. या संदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या संदर्भातील माहिती मागितली, परंतु यांच्याकडूनही कुठलेच उत्तर मिळाले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर