शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तयार झालेले फॉल्कन २०२१ मध्ये भरणार उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:11 IST

मिहानमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि. (डीआरएएल) च्या शेडमध्ये फॉल्कन २००० विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे डीआरएएलचा दावा आहे की, २०२१ पर्यंत फॉल्कन पूर्णपणे तयार होऊन उड्डाण भरेल.

ठळक मुद्देडीआरएएलमध्ये विमानाचे पहिले कॉकपिट तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि. (डीआरएएल) च्या शेडमध्ये फॉल्कन २००० विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे डीआरएएलचा दावा आहे की, २०२१ पर्यंत फॉल्कन पूर्णपणे तयार होऊन उड्डाण भरेल.यावर्षी जानेवारी महिन्यात धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्कच्या शेडमध्ये फॉल्कनचे निर्माण कार्याला सुरुवात झाली. तीन महिन्यात शेड तयार झाले आणि कॉकपिट बनविण्याचे कामही सुरू झाले. मिळालेल्या माहितीनुसार डीआरएएलमध्ये फ्रान्सचे १० ते १२ अधिकारी आपल्या कुटुंबासह कार्यरत आहे. येथे काम करणारे आयटीआय डिप्लोमा होल्डर, तंत्रज्ञ नागपूरचे आहे. त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रशिक्षणापूर्वी स्थानिक पाच५ इंजिनिअरना प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे भविष्यात एका छोट्या प्लॅण्ट बरोबरच कंपनीद्वारे २६ एकरमध्ये भव्य निर्माण कार्य करण्यात येणार आहे.२०२१ मध्ये तयार होईल विमानफॉल्कन २००० विमानाचे सध्या कॉकपिट तयार करण्यात आले आहे. २०२१ पर्यंत नागपुरातच हे विमान तयार होऊन, त्याला रवाना केले जाईल. डीआरएएलचे काही निर्माणाधीन काम वेगाने सुरू आहे. फॉल्कन विमान निर्मितीची प्रगती बघून इतर विमान कंपन्यासुद्धा मिहानमध्ये रुची दाखवित आहे.दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी, नागपूर

 

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर