शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा!

By योगेश पांडे | Updated: June 16, 2025 15:06 IST

Nagpur : 'ऑनलाइन प्रसाद' घोटाळ्याची मालिका! सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती

योगेश पांडेनागपूर : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्रे असून, त्या पवित्र ठिकाणी पोहोचता येत नसले तरी तेथील प्रसाद ग्रहण करता यावा, अशी भाविकांची अपेक्षा असते. विशेषतः ज्योतिर्लिंग, वैष्णोदेवी, अयोध्या, काशी, मथुरा इत्यादी ठिकाणच्या प्रसादाकडे भाविक डोळे लावून बसलेले असतात. मात्र, भाविकांच्या याच श्रद्धेचा सायबर गुन्हेगारांकडून दुरुपयोग करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा प्रसाद ऑनलाइन डिलिव्हर करण्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचण्यात येते. प्रसादाच्या नावाखाली अॅडव्हान्स पैसे मागवून प्रसाद डिलिव्हर करण्यात येत नाहीच. याशिवाय काही महाभाग तर पैसे घेतल्यावर प्रसाद म्हणून स्थानिक दुकानांतील मिठाई वगैरे पाठवितात. अव्वाच्या सव्वा पैसे आकारून अशा पद्धतीने श्रद्धेशी खेळ सुरू असून, भाविकांनी यासंदर्भात अलर्ट होण्याची गरज आहे.

आपल्या देशात श्रद्धेला मोल नाही, असे म्हणतात. याच श्रद्धेच्या नावाखाली काही गुन्हेगारांनी फसवणुकीचे जाळे रचले आहे. केवळ प्रसाद किंवा इतर साहित्यच नव्हे, तर अगदी तीर्थक्षेत्रांच्या धर्मशाळांच्या नावावरही फसवणुकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. इंटरनेट तसेच विविध सर्च इंजिन्सवर सायबर गुन्हेगार प्रसाद किंवा इतर ऑनलाइन सुविधा देत असल्याचे सांगत त्यावर स्वतःचा मोबाइल क्रमांक अपलोड करतात. त्या मोबाइल क्रमांकावर भाविकांनी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून अॅडव्हान्स पैसे घेण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात भाविकांना प्रसाद किंवा इतर साहित्य कधीच मिळत नाही.

धर्मशाळा - भक्तनिवासांच्या नावाखालीही 'फ्रॉड'इतकेच काय तर भक्तनिवास व धर्मशाळांमध्ये भाविक पोहोचल्यावर त्यांचे बुकिंग झालेच नसल्याची बाब समोर येते. नागपुरातील अनेकांसोबत अशा पद्धतीचे फ्रॉड झाले आहेत. जैन समाजातील एक कुटुंब आग्रा येथे गेले होते. त्यांनी ऑनलाइन माध्यमातूनच तेथील मुख्य बाजारातील धर्मशाळेचे इंटरनेटवरून क्रमांक शोधून बुकिंग केले. समोरील व्यक्तीने बुकिंगसाठी पैसेदेखील घेतले. मात्र, कदंब तेथे पोहोचले असता प्रत्यक्षात संबंधित क्रमांक धर्मशाळेचा नव्हताच, अशी बाब समोर आली. असे प्रकार मागील काही काळापासून वाढीस लागले आहेत.

अयोध्येचा महाप्रसाद घोटाळ्याची पोलखोल, इतर ठिकाणांचे काय ?प्रसादाच्या नावाखाली घोटाळ्याचा एक प्रकार अयोध्येत समोर आला. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रसादाच्या नावाखाली ३.८५ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. आशिष सिंग नावाच्या आरोपीने यासाठी बनावट संकेतस्थळ सुरू केले होते. त्याने स्वतःला सिएटलमधील नॉर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे भासवले आणि लाखो भाविकांना राम मंदिराचा प्रसाद घरपोच मिळेल, अशी बतावणी केली होती. त्याने देश-विदेशातील भाविकांकडून ऑर्डर्स घेतल्या आणि स्थानिक मिठाई प्रसाद म्हणून डिलिव्हर करणे सुरू केले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर घोटाळा समोर आला. असेच प्रकार देशातील इतरही अनेक तीर्थक्षेत्रांबाबत सुरू आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी