शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पत्रकार मुन्ना पटेलकडून मेडिकलमध्ये पोलिसांवरच हल्ला; जनतेत चिंतेचे वातावरण

By योगेश पांडे | Updated: December 5, 2023 19:33 IST

नागपुरातील बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी कमी होणार?

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ताब्यात असलेल्या खंडणीखोर व बोगस पत्रकाराकडून मेडिकल परिसरात त्याच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसावरच हल्ला करण्यात आला. संबंधित आरोपीला न्यायालयाच्या निर्देशांनुसार वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मुन्ना उर्फ मुस्ताक अहमद खान पटेल (४५, भूपेशनगर, महेशनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो बोगस पत्रकार असून, दुकानदारांना धमकावून खंडणी वसुली करायचा. अनेक काळापासून त्याचा हा प्रकार सुरू होता. त्याला एका कॅफेचालकाकडून एक लाखाची खंडणी मागण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला २ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्याला जेल वॉरंट मिळाल्याने त्याची वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. सुखदेव गिरसावरे, नितेश पारधे, दिनेश जुमनाके, उज्वल पाटेकर हे कर्मचारी त्याला मेडिकलमध्ये घेऊन गेले. त्याला ट्रॉमामध्ये नेत असताना मुन्नाने पोलिसांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने नितेश पारधे यांना बोखडले व हाताबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्याला पकडल्यावर त्याने ‘मी तुमची वर्दी उतरवेन, सस्पेंड करून टाकेन,’ अशी धमकीदेखील दिली. अखेर त्याला गाडीत टाकण्यात आले. त्यानंतरही त्याचा आरडाओरडा सुरूच होता. त्याच्याविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बोगस पत्रकारांचे काय ?स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यापर्यंत मुन्नाची मजल गेली. त्याच्याप्रमाणे शहरात अनेक बोगस पत्रकार फिरत आहेत. ते अनेकांकडून खंडणी वसुली करतात. बदनामीच्या भीतीपोटी लोकदेखील तक्रारीसाठी समोर येत नाहीत, अशा पत्रकारांवर वचक आणण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :nagpurनागपूर