शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र भोवले : कुख्यात सिराजला पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 10:44 PM

Fake Corona Certificate पोलिसांच्या कारवाईतून सटकण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांना देणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देपोलिसांची कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलिसांच्या कारवाईतून सटकण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांना देणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सिराज नागपुरातील कुख्यात बुकी असून त्याचा लॉटरीचाही व्यवसाय आहे. ट्रॅव्हल्स आणि केबलचा व्यवसाय दाखवून तो आपल्या अवैध धंद्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करतो. चार आठवड्यापूर्वी त्याच्या साथीदारांना क्रिकेट बेटिंग करताना पोलिसांनी पकडले होते. त्या गुन्ह्यात सिराज फरार होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल गुन्हे शाखेतून माहीत पडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सिराजच्या तातडीने मुसक्या बांधण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनचे प्रभारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी गुरुवारी रात्री आपल्या पथकामार्फत कुख्यात सिराजला पकडले. त्याला ठाण्यात आणल्याचे कळताच पोलीस आयुक्त स्वतःच गणेशपेठ ठाण्यात पोहोचले. त्यांनी स्वतःच तेथे सिराजची खबरबात घेतली.

दरम्यान, सिराजचे अनेक पोलिसांसोबत मधुर संबंध आहेत. काही दलालही त्याने पेरून ठेवले आहेत. पोलीस आयुक्तांची नजर असल्यामुळे सिराजची कुंडली बाहेर काढली जाऊ शकते, असे सिराजला कळले होते. त्यामुळे साथीदारांच्या माध्यमातून सिराजने कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या मदतीने सिराजने पोलीस कोठडीतून सटकण्याचा डाव टाकला होता; मात्र पोलीस आयुक्तांनी त्याच्या प्रमाणपत्रावर विश्वास न ठेवता सिराजची शुक्रवारी टेस्ट करून घेतली. त्यात तो निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सिराजविरुद्ध कोरोना संसर्गाच्या धोक्याचा आणि बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी सिराज आणि त्याला बनावट कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र मिळवून देणारे गजानन कोहाडकर तसेच जावेद या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांना शुक्रवारी रात्री अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.

नवीन घडामोडीची शक्यता

कुख्यात सिराज शेखचे अवैध धंदे आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात आणखी काही मोठ्या घडामोडी घडू शकतात.पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर तपास करीत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीArrestअटक