शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंडशीपने केले विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:40 IST

फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देगुंगीचे औषध देऊन व्हिडीओ केला व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क      नागपूर : फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके (२१) रा. गरोबा मैदान, हरिहरनगर यास अटक केली.पीडित १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सतीशशी ओळख झाली. तिच्या म्हणण्यानुसार सतीशने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून  जाळ्यात ओढले. ती बीबीएची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील आॅटो चालवितात. सतीश टवाळखोर असून व्यसनी आहे. पीडित विद्यार्थिनी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सतीशने तिला प्रभावित करण्यासाठी मोबाईल भेट दिला. १ जुलैला सतीशने तिला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले. घरी त्याचे कुटुंबीय असतील असे समजून ती त्याच्या घरी गेली. परंतु घरी सतीश एकटा होता. युवतीच्या तक्रारीनुसार सतीशने तिला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.त्यानंतर सतीशने तिच्यावर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली. काही वेळानंतर विद्यार्थिनीला शुद्ध येताच तिने सतीशला याबाबत विचारणा केली. त्याने शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केल्याचे सांगून घटनेची माहिती कुणाला दिल्यास ही क्लिप सोशल साईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने सतीशसोबत दुरावा केला. त्याच्याशी बोलणेही बंद केले. १० जुलैला सतीश तिच्यावर घरी येण्यासाठी दबाव टाकत होता. विद्यार्थिनीने त्याला आपल्याशी संबंध तोडून टाकण्यास सांगितले. सतीशने तिला दिलेला मोबाईल परत करण्यास सांगितला. तिने तो त्वरित परत केला. मोबाईलमध्ये सीमकार्ड होते. विद्यार्थिनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतरांच्या संपर्कात होती. तिचे व्हॉट्सअ‍ॅप पाहून सतीशच्या डोक्यातील राक्षस जागा झाला. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ व्हायरल केला. बुधवारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लकडगंज पोलिसात सतीश विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, छेडखानी, धमकी देणे, मारहाण करणे आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली. सतीश रामटेके व्यसनी असून एक-दोन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात उपचारही घेतले आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थिनींचेही शोषण झाल्याची शंका आहे. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात आहेत.

विवाहितेचा व्हिडीओही केला व्हायरलदुसऱ्या एका घटनेत धंतोली येथील एका विवाहितेचा व्हिडीओही अशाच पद्धतीने एका युवकाने व्हायरल केल्याची घटना घडली आहे. यात ४८ वर्षीय विवाहित महिलेचे वस्तीतील २८ वर्षाच्या नीतेश ऊर्फ श्रीकांत बरडेसोबत संबंध होते. श्रीकांतने या महिलेसोबत आपत्तीजनक व्हिडीओ क्लिप तयार केली. ही क्लिप त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली. त्याची माहिती मिळताच विवाहित महिलेने तक्रार दाखल केली. धंतोली पोलिसांनी छेडखानी तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाFacebookफेसबुक