शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी एसटीच्या अतिरिक्त बसेस  : पुणे मार्गावर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:12 IST

दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शिवशाही (आसनी) नियमित फेऱ्यांशिवाय जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शिवशाही (आसनी) नियमित फेऱ्यांशिवाय जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-पूणे (शिवशाही आसनी) या मार्गावर गणेशपेठ बसस्थानकावरून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच पुणे ते नागपूर या मार्गावर पुणे येथील न्यू शिवाजीनगर वाकडेवाडी येथून २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, रात्री ८, ८.३०, २४ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ८, ८.२०, ८.३० वाजता आणि २५ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ७.४५, रात्री ८, ८.१०, ८.१५, ८.२०, ८.३०, ८.३५, २६ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३०, ८, ८.३० वाजता बसेस सोडण्यात येतील. तसेच नागपूर-माहुर, नागपूर-किनवट, नागपूर-आकोट, नागपूर-मोर्शी, सावनेर-अमरावती, रामटेक-परतवाडा, नागपूर-अमरावती, नागपूर-पुसद, काटोल-माहुर, काटोल-अकोला, सावनेर-माहुर, उमरेड-परतवाडा जाणाऱ्या आणि येणाऱ्या साध्या बसेस गणेशपेठ बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. शिवशाही बसमध्ये आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, उद्घोषणा प्रणाली असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. शिवशाही वातानुकूलित बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूरच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.

टॅग्स :state transportएसटीPuneपुणेDiwaliदिवाळी