शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुडांचा उपराजधानीतच डेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:43 IST

नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. परिणामी गुन्हे शाखेने सोमवारी रात्री विशेष शोधमोहिम राबवून एकाच रात्रीत आठ तडीपार गुंडांना जेरबंद केले.

ठळक मुद्देएकाच रात्रीत आठ सापडले : कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. परिणामी गुन्हे शाखेने सोमवारी रात्री विशेष शोधमोहिम राबवून एकाच रात्रीत आठ तडीपार गुंडांना जेरबंद केले.वारंवार गुन्हे दाखल करून आणि वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारांच्या वृत्तीत फरक पडत नसल्यामुळे अशा सराईत गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात येते. वर्र्षभरात असे अनेक गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना नागपूर शहराबाहेर नेऊन सोडल्यानंतर संबंधित पोलीस त्यांना तडीपारीच्या कालावधीत पुन्हा नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देतात. मात्र, अनेक गुन्हेगार लगेच नागपुरातच परतात. ते येथे राहतात अन् गुन्हेगारीही करतात. गुन्हेगारीत सक्रिय असलेले अनेक तडीपार गुंड पोलिसांना वेळोवेळी सापडतात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तडीपार गुंडांना हुडकून कोठडीत डांबण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त संजीव कांबळे यांनी शहरातील गुन्हेशाखेच्या पाचही पथकांना सोमवारी रात्री तडीपार गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राबविण्यात आलेल्या मोहिमेत कुख्यात गुंड प्रवीण लक्ष्मीकांत घाटे, शब्बीर खान बशिर खान, संघरत्न ऊर्फ शंकर मिलिंद भोयर, भोला ऊर्फ इरफान खान, वाट्या ऊर्फ सूरज टिकाराम धापोडकर, शुभम देवकीनंदन बिरहा. राजा ऊर्फ राजेश वसंतराव ठाकरे, छोटू ऊर्फ राकेश महादेव रामटेके या आठ गुन्हेगारांना विविध वस्त्यांमध्ये पकडले. त्यांना आज कोठडीत डांबण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस