शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणासाठी करावा लागणार व्यापक विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:40 PM

Artificial migration, tigers, Nagpur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देयापूर्वीही झाले प्रयोग : अभ्यासासाठी समितीला वेळ अपुरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून वनमंत्र्यांनी वाघांच्यास्थलांतरणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे. डिसेंबरअखेर त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. राज्यात वाघांसदर्भात अनेक विषय अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. वाघांच्या स्थलांतरणाच्या अभ्यासासाठी समितीला हा अडीच महिन्याचा काळ अपुरा पडणार आहे. यामुळे आतापासूनच या विषयावरून क्रिया-प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनसोबतच बफर झोनमध्येही वाघांची संख्या वाढली आहे. ही संख्या आता २५० च्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास कमी पडायला लागल्याने येथील वाघ नव्या अधिवासाच्या शोधात आहेत. या काळात वाढलेल्या वन्यजीव संघर्षांच्या घटनांमुळे येथील वाघांचे स्थानांतरण करण्याची मागणी व्हायला लागली.प्रत्यक्षात वाघांचे कृत्रिम स्थलांंतरण ही निसर्गनियमाविरूद्धची प्रक्रिया आहे. त्यामळे अनेकांकडून यासंदर्भात आतापासूनच नाराजीचा सूर उमटायला लागला आहे. हे कृत्रिम स्थलांतरण निसर्गनियमासोबत सुसंगत कसे ठरू शकते, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे. वाघांचा भ्रमणमार्ग मोठा असल्याने ते हजार किलोमीटरच्या वर फिरतात. मात्र अधिवास निवडताना पसंतीचा निवडतात. स्थलांतरणामध्ये वाघांची स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची मानसिकता कशी तपासणार, असा मुद्दा आता पुढे येत आहे. येथील वाघांना अन्य क्षेत्रामध्ये स्थलांतरित केल्यावर तेथील समस्या वाढण्याची शक्यता आहे. या वाघांना महाराष्ट्रातच स्थलांतरित करणार की अन्य राज्यांचे जंगल निवडणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.वाघांच्या स्थलांतरणाचा हा प्रयोग नवा नसून यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बिबटांचे स्थलांतरण करण्याचा प्रयोग झाला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. मध्य प्रदेशात आणि राजस्थानातील सारिस्कामध्येही असा प्रयोग झाला. मात्र त्याला यात यश आले नाही. आता ताडोबातील वाघांच्या बाबतीही असा प्रयोग होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने यापूर्वीचे प्रयत्न तपासावे, अशी अपेक्षा व्याघ्रप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :TigerवाघMigrationस्थलांतरण