दानागंज मॉलच्या उभारणीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:48+5:302021-06-22T04:07:48+5:30

नागपूर : जुना भंडारा रोड येथील दानागंजमध्ये महापालिकेच्या शॉपिंग मॉलचे काम मागील सात वर्षांपासून रखडले आहे. कधी करारनामा तर ...

Extension for construction of Danaganj Mall | दानागंज मॉलच्या उभारणीसाठी मुदतवाढ

दानागंज मॉलच्या उभारणीसाठी मुदतवाढ

Next

नागपूर : जुना भंडारा रोड येथील दानागंजमध्ये महापालिकेच्या शॉपिंग मॉलचे काम मागील सात वर्षांपासून रखडले आहे. कधी करारनामा तर कधी आर्थिक वर्ष संपल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पुन्हा एकदा या मॉलचे बांधकाम करा, उपयोग करा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारण्यासाठी ३ वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहात येत आहे.

मंगळवारी २२ जूनला आयोजित ऑनलाइन सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ऑरेंज सिटी मॉल प्रा. लिमिटेडसोबत ८ मार्च २०१४ रोजी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल तयार करण्याचा करार करण्यात आला होता. त्यानंतर संशोधित करार २७ सप्टेंबर २०१७ मध्ये झाला. परंतु, बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. आर्थिक वर्ष निर्धारित वेळेत न झाल्याने अडचण झाली, तर २० हजार चौरस वर्गमीटरपेक्षा अधिक बांधकाम करण्यासाठी पर्यावरणाबाबतची मंजुरी घेणे आवश्यक असते. संशोधित नकाशा मंजुरीसाठी नगर रचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. पर्यावरणाची मंजुरी २ फेब्रुवारी २०१९ रोजी मिळाली. त्यापूर्वी दुसरी एजन्सी काम करणार होती, त्या एजन्सीचे ६ कोटी रुपये जमा आहेत. त्यानंतर २.५० कोटी रुपये कंपनीने आणखी जमा केले. त्यात व्याजाचे १.८१ कोटी रुपये मिळाले. एकूण १०.३० कोटी रुपये जमा आहेत. कोरोनामुळे काम होऊ शकले नाही. आता पुन्हा एजन्सी काम करण्यास उत्सुक आहे. यामुळे आता २८ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात येत आहे. सन २०१९-२० चे १.१६ कोटी रुपयांचा प्रीमिअम भरण्यास कंपनी तयार आहे. अशातच प्रस्तावाला महापालिकेकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच आमसभेत कंत्राटावर नियुक्त ५६ शिक्षकांना सन २०२१-२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची योजना आहे, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटी रुपयांच्या संशोधित डीपीआरला नोटिंगसाठी सादर करण्यात येणार आहे.

............

रखडलेल्या कामाबाबत उचलणार आवाज

महापालिकेच्या बजेटला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. परंतु, महापालिका आयुक्तांचा हिरवा झेंडा मिळणे बाकी आहे. यामुळे प्रभागातील विकासकामे थांबली आहेत. या विकासकामांसाठी नगरसेवक सभागृहात आवाज उचलू शकतात.

..........

Web Title: Extension for construction of Danaganj Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.