शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवकांपर्यंत पोहोचवा : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:47 IST

पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यावतीने ‘पशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसेच शेतकऱ्यांची समृद्धता’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु प्रा. डॉ. एम. एम पातुरकर, अपर जिल्हाधिकारी तथा कुलसचिव चंद्र्रभान पराते, नियोजन आयोगाचे पूर्व सदस्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. सदामते, इंडियन व्हेटरनरी एक्सटेन्शन फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. राम कुमार, सरचिटणीस प्रा. डॉ. के. सी. वीरण्णा, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ आर. के. अंबाडकर उपस्थित होते.महादेव जानकर म्हणाले, पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना पशुवैद्यक क्षेत्रीतील उद्योजकतेच्या संधीची कवाडे युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांसाठी खुली करण्यासाठी राज्य शासन विविध धोरणांची अंमलबजावणी करीत आहे. संचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल पाटील यांनी तर आभार आयोजन समितीचे सचिव डॉ. एस. पी. लांडगे यांनी मानले.पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विस्ताराची गरजमहादेव जानकर यांनी यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा विस्तार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृषी विभागाचे राज्यामध्ये चार विद्यापीठे आहे. परंतु पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ राज्यात केवळ नागपूरला आहे. तेव्हा याचा विस्तार करण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागाच्या धर्तीवर कुक्कुटपालन, मेंढी व शेळी पालन करणाऱ्या पशुपालकांना पशु व त्यांचे आजार, उपचार याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस प्रणाली विकसित करावी. पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपयोगी नवनवीन माहिती, नाविन्यपूर्व उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरMaharashtra animal and fishery sciences universityमहाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ