- ‘कॅट’ नागपूरचा अनोखा उपक्रम
नागपूर : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) नागपूर शाखेशी जुळलेले व्यापारी रविवार, १४ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता भिलगाव येथील पंचकमिटी हनुमान मंदिरात मातृभूमीप्रति प्रेम व्यक्त करून अनोख्या पद्धतीने ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करणार आहेत.
कॅटच्या उपाध्यक्ष व महिला समितीच्या संयोजिका ज्योती अवस्थी सभेत म्हणाल्या, या कार्यक्रमात युवा वर्ग आणि अन्य नागरिक भारतमातेला लाल फूल अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. आयोजन भिलगाव निवासी दीपा पचोरी आणि शालिक वंजारी करणार आहेत. सभेत टीम कॅट नागपूरचे चेअरमन गोपाल अग्रवाल, अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महासचिव फारुक अकबानी, राजकुमार गुप्ता, प्रभाकर देशमुख, निखिलेश ठाकर, ज्ञानेश्वर रक्षक, जयश्री गुप्ता, विनोद गुप्ता, सुनंदा टिटूरकर, विधान मिश्रा, उषा उईके, आदित्य तिवारी, राज पचुरी, देवाशीष पिल्ले उपस्थित होते.