शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:30 IST

उपकरणे तयार करणाऱ्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’मधील घटना

जितेंद्र ढवळे/योगेश पांडे/ब्रिजेश तिवारीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरजवळील चाकडोह येथील भारतीय सैन्यदलासह विविध कामांसाठी स्फोटके आणि अन्य उपकरणे तयार करणाऱ्या ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. घटनेबाबत कळताच कामगारांच्या नातेवाइकांसह स्थानिकांनी कंपनीकडे धाव घेत आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.   

कोळसाखाणीसाठी लागणारी स्फोटके बनविण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यामुळे युनिटची इमारत उद्ध्वस्थ झाली. मलब्याखाली जिवंत स्फोटकेदेखील दबल्या गेल्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नव्हते. 

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्रीसोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोटाच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कंपनीनेदेखील २० लाख रुपये मदत जाहीर केली आहे.  

उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनीही दिली भेटउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाकडून दखलसोलर इंडस्ट्रीजमध्ये सैन्य दलासाठी मल्टिमोडल ग्रेनेड्स तयार केले जात असल्याने या स्फोटाची संरक्षण मंत्रालयानेदेखील दखल घेतली आहे.  हा स्फोट अपघातामुळे झाला आहे की, यामागे घातपात आहे याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. घटनेची ‘एटीएस’, फॉरेन्सिक  तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठी लागणारा विविध दारूगोळा, शस्त्रे तयार करण्यात येतात. तसेच ड्रोन्स, इंडस्ट्रीअल स्फोटके, इलेक्ट्रिकल डेटोनेटर्सही उत्पादित केले जातात. त्यामुळे नियमित सुरक्षाविषयक ऑडिट करण्यात येते. तरीही  स्फोट झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 

संपूर्ण परिसर केला ‘सील’स्फोटानंतर संपूर्ण परिसर ‘सील’ करण्यात आले. स्फोटाचे हादरे इतर युनिट्सलादेखील बसले. इतर युनिटमधील कामगारांनाही बाहेर काढले आहे. घटनेची चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

युनिटमध्ये नेमके घडले तरी काय?युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी लागणाऱ्या ‘बूस्टर्स’चे उत्पादन सुरू होते. कुठलीही स्फोटके तयार करताना कच्च्या मालाची चाळणी होते व त्याचे ‘सिव्हिंग’ करण्यात येते. तेच काम सुरू असताना स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Blastस्फोटIndian Armyभारतीय जवान