शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

स्फोटके अन् नागपूर कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:10 IST

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात कुठेही स्फोट झाला किंवा स्फोटके सापडली, तर बऱ्याचदा त्या घडामोडीशी नागपूरचे ...

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशात कुठेही स्फोट झाला किंवा स्फोटके सापडली, तर बऱ्याचदा त्या घडामोडीशी नागपूरचे नाव जोडले जाते. हैदराबाद, कर्नाटकसह यापूर्वी ठिकठिकाणी झालेल्या स्फोटात नागपूरच्या स्फोटक कंपनीत तयार झालेल्या स्फोटकांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर गडचिरोली, छत्तीसगडपासून काश्मिरपर्यंत ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेली स्फोटकेही नागपुरातीलच असल्याचे उघड झाले. गुरुवारी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकेही नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतून बाहेर पडल्याचे उजेडात आल्याने, तपास यंत्रणांच्या नजरा पुन्हा एकदा नागपूरकडे वळल्या आहेत. स्थानिक पोलीस आणि प्रसारमाध्यमांकडून संबंधित कंपनी प्रशासनाकडे सारखी विचारणा होत असल्याने नागपूर आणि येथील स्फोटक कंपन्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.

स्फोटके निर्माण करणाऱ्या नागपूर जिल्ह्यात सात एक्सप्लोसिव्ह कंपन्या आहेत. सोलार एक्सप्लोसिव्ह (चाकडोह, कोंढाळी), इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह (सावंगा, कोंढाळी), केलटेक एक्सप्लोसिव्ह (गरमसूर, कोंढाळी), ओरिएन्ट एक्सप्लोसिव्ह (शिवा खापरी, कोंढाळी), एसबीएल एक्सप्लोसिव्ह (कोतवाल बर्डी, कळमेश्वर), कमर्शिअल एक्सप्लोसिव्ह (गोंडखैरी, कळमेश्वर) आणि अम्मा एक्सप्लोसिव्ह (ढगा, कळमेश्वर) या त्या कंपन्या होत. कांड्या, पावडर आणि द्रव स्वरूपातील स्फोटके त्या तयार करतात. २००८ च्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड पेट्रोलियम ऑफ सेफ्टी (पेसो)च्या नियंत्रणात (देखरेखीत) या कंपन्यात आहेत. या कंपन्या, तसेच स्फोटकं खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्यांना पेसोतर्फे परवाने दिले जातात. त्यांनाच कंपनी स्फोटक विकत असते. तयार होणाऱ्या प्रत्येक स्फोटकाच्या उत्पादन आणि खरेदी-विक्रीची माहिती पेसोच्या पोर्टलवर नोंदविली जाते आणि ही माहिती पोलिसांनाही दिली जाते. घातपात, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, चार वर्षांपासून प्रत्येक स्फोटकावर बॅच नंबर असतो. ज्या बॉक्समध्ये ही स्फोटके दिली जातात. त्यावर बॅच नंबर आणि एक बारकोड असतो. त्यावरून देखरेख करणाऱ्या पेसोच्या पोर्टलवर त्याचा ट्रॅक मिळतो. जिलेटिन, ईमलशन्सच्या २०० कांड्या एका बॉक्समध्ये असतात आणि खरेदीची ऑर्डर नोंदविणाऱ्या बहुतांश कंपन्या १०० बॉक्स, २०० बॉक्सची मागणी करीत असतात. अर्थात, ही स्फोटके कुणाला विकली होती, ती कुठून कुठे पोहोचली, मध्ये ती कुठे उतरविण्यात आली, ती सगळी माहिती पेसोच्या पोर्टलवर ूबारकोडमुळे नोंदली जाते; मात्र नंतर वितरकाकडून ती खुली करण्यात आल्यास अन् त्याचा स्फोटात वापर झाल्यास त्याचा शोध लावणे कठीण जाते. हीच बाब दहशतवादी, नक्षलवाद्यांनी हेरली असून, तिचा बेमालूम वापर करून ते ठिकठिकाणी घातपाती कृत्ये घडवून आणतात. सात वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये दहशतवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून आणला होता. त्यात नागपुरातील तत्कालीन अमिन एक्सप्लोसिव्ह कंपनीचे द्रव स्वरूपातील (नियोजेल) स्फोटक वापरण्यात आले होते. आता अंबानी यांच्या बंगल्याजवळ गुरुवारी आढळली अन् त्याचेही नागपूर कनेक्शन उजेडात आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा नागपूरकडे नजर वळविली आहे.

---

जिलेटिन नाही ईमल्शन

अंबानी यांच्या बंगल्याजवळ आढळलेल्या कांड्या जिलेटिन नव्हे, त्याला ईमल्शन्स म्हणतात. जिलेटिनच्या तुलनेत त्याची स्फोटक क्षमता कमीच असते. जिलेटिन साधारणत: सात वर्षांपर्यंत उपयोगात आणले जाते. ईमल्शनची पॉवर केवळ सहा महिन्यांपर्यंतच असते. नंतर ते आपोआप निष्काम होतात.

---

यासाठी होतो वापर

कोळसा खदानी, विहिरी, नियोजित मार्गांच्या मध्ये येणारे उंचवटे कापण्यासाठी (हिल कटिंग) जिलेटिन, ईमल्शनचा वापर होतो.

---

‘ती’ तशी निकामीच

ही स्फोटके (ईमल्शन) तशी निकामीच आहेत. कारण जोपर्यंत ती डिटोनेटर्सला जोडली जात नाहीत, तोपर्यंत त्याचा स्फोट होत नाही. सापडलेल्या ईमल्शनच्या कांड्या आदळल्या, फेकून मारल्या किंवा त्यांच्यावरून कोणते अवजड वाहन जरी गेले, तरी त्याचा स्फोट होत नाही, असा दावा सोलर एक्सप्लोसिव्हचे महाव्यवस्थापक सोमेश्वर मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

-----