शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:56 IST

ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

ठळक मुद्देनवीन नियमांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला.कंपनीने नियमात बदल केल्याच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयक नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो रायडरनी सोमवारी संविधान चौकात धरणे दिले. पक्षाचे शहर प्रमुख राजू तुमसरे हे उपस्थित होते. तिवारी यांनी सांगितले की, २४ तासात समस्या सुटली नाही तर डिलिव्हरी बंद केली जाईल. पक्षाच्या शिष्टमंडळाने वाहतूक विभागाचे उपायुक्त गजानन राजमाने यांची भेट घेऊन त्यांचेशी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, रायडर कामासाठी ज्या मोटरसायकलचा वापर करतात त्याचे रजिस्ट्रेशन कमर्शियल वाहन म्हणून व्हावे.आंदोलनात मुन्ना तिवारी, अब्बास अली, आशिष हाडगे, अभिषेश दुर्वे, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले, राजा रामतवार, योगेश न्यायखोर, रूपेश बागड, छगन सोनवणे, अक्षय मेश्राम, राम कुकडे, आशिष देशमुख, रवी चुरांगले, सोनू तिवारी, प्रवीण शर्मा, कमल पल्लेवार, सुनील बॅनर्जी, मनोज साहू, गणेश सालंकी, रवी सिर्सीकर, ललित बावनकर, दीपक यादव, गौरव साहू, महेश महाड़िक, संजोग राठोड, दीपक पोहनकर आदींचा समावेश होता.नियमात कोणते बदल केलेरायडरला फूड डिलेव्हरीचे कमिशन दिले जाते. टार्गेट पूर्ण केल्यावर इन्सेंटिव्ह दिले जाते. पूर्वी हे टार्गेट सोमवारपासून गुरुवारपर्यंत प्रति दिन १६ ऑर्डर इतके होते. ते पूर्ण करणाऱ्यांना ५२५ रुपयाचे इन्सेंटिव्ह दिले जात होते. प्रत्येक ऑर्डरवर ४० रुपये कमिशन मिळायचे. या कामासाठी रायडरला स्वत:च्या मोटारसायकलचा वापर करायचा होता. पेट्रोल खर्च ही स्वत:लाच उचलायचा होता. टी-शर्ट व फूड कॅरिबॅगसाठी १५०० रुपये द्यावे लागतात. कंपनीने नुकतेच नियमात बदल करीत इन्सेंटिव्हसाठी टार्गेट वाढवून २० ते २२ ऑर्डर असे केले आहे. रायडरनुसार सोमवार ते गुरुवारपर्यंत दररोज २० व शनिवारी -रविवारी २२-२२ ऑर्डर करायचे आहे. हे शक्य नाही. कारण एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतात. डिलेव्हरीचे अंतरही १० किमीवरून १५ किमी करण्यात आले आहे. यात पेट्रोलचा खर्च आणखी वाढणार आहे. सलग २४ तास काम केले तरीही त्यांना इन्सेंटिव्ह मिळू शकणार नाही, असे या मुलांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाagitationआंदोलन