शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  प्रॉपर्टी डिलरकडून महिलेचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:07 IST

विवाहितेवर (वय ३६) बलात्कार करून एका प्रॉपर्टी डिलरने तिला पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा होताच आरोपीने तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपी जितेंद्र राधेश्याम तिवारी (वय ३३) याच्याविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगर्भधारणेनंतर वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न : बलात्काराची तक्रार : वाडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाहितेवर (वय ३६) बलात्कार करून एका प्रॉपर्टी डिलरने तिला पतीपासून फारकत घेण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिला गर्भधारणा होताच आरोपीने तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपी जितेंद्र राधेश्याम तिवारी (वय ३३) याच्याविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पीडित महिला वाडीला ज्या भागात राहते, त्या भागात आरोपीचे प्रॉपर्टी डिलिंगचे काम आहे. ओळखी असल्याने तो तिच्या घरी जायचा. १३ फेब्रुवारी २०१५ ला असाच तो तिच्या घरी गेला. महिलेचा पती यावेळी घरात नसल्याचे पाहून पिण्याचे पाणी मागितल्यानंतर आरोपी तिवारीने महिलेवर बलात्कार केला. हे कुणाला सांगितले तर तुझीच बदनामी होईल, असे सांगून त्याने नंतर तिला गप्प केले. महिला गप्प बसल्यानंतर आरोपी नेहमी तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. या अनैतिक प्रकाराची कुणकुण महिलेच्या पतीला लागल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी आरोपीने तिला पतीपासून फारकत घेण्यास सांगून स्वत: लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, महिलेने पतीपासून फारकत घेतली. यानंतर आरोपी तिच्यावर पत्नीसारखा हक्क दाखवू लागला.दोनदा गर्भपात, तिसऱ्यांदा पुन्हा ...!सततच्या शरीरसंबंधामुळे महिलेला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने आरोपी तिवारीमागे लग्नासाठी तगादा लावला. आरोपीने तिचा दोनदा गर्भपात करवून घेतला. तिला आता तिसºयांदा गर्भधारणा झाली. ४ डिसेंबरला आरोपीने नेहमीप्रमाणे तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा विषय काढताच त्याने नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. महिला ऐकत नसल्याचे पाहून त्याने तिला पुन्हा गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपातानंतर लग्न करू, असेही म्हटले. आरोपीने दोनदा अशाच प्रकारे तिचा गर्भपात करवून घेतल्यानंतर लग्नास टाळाटाळ केल्यामुळे महिलेने आरोपी तिवारीला यावेळी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे तिवारीने तिला धमकी दिली. परिणामी महिलेने या प्रकरणाची तक्रार वाडी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात आरोपी तिवारीविरुद्ध बलात्कार तसेच विश्वासघात केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार