शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देशात फुफ्फुस आकुंचनाचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:45 IST

देशातील वाढते प्रदूषण व धूम्रपानामुळे फुफ्फुस आकुंचनाची जोखीम वाढत असल्याचे मत ज्येष्ठ फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देफुफ्फुस विकारतज्ज्ञ विक्रांत देशमुख यांची माहिती प्रदूषण व धूम्रपान ठरतेय कारणलक्षणे हृदयात कोंडलेपणा वाटणे कारणाशिवाय वजन घटणे भूक न लागणे बोटांचा आकार बदलणे सांधे आणि स्नायूदुखी

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील वाढते प्रदूषण व धूम्रपानामुळे फुफ्फुस आकुंचनाची जोखीम वाढत असल्याचे मत ज्येष्ठ फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले आहे. मूत्रपिंड, यकृताचा आकार ज्याप्रमाणे आकुंचन पावतो, त्याचप्रमाणे शरीराला आॅक्सिजन पुरवठा करणारे फुफ्फुसही आकुंचन पावते. सरासरी लोकसंख्येत क्वचित असे रुग्ण आढळतात. मात्र, हल्लीच्या निदान तंत्रामुळे हा आजार ओळखणे सोपे झाले आहे, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे दिली.डॉ. देशमुख म्हणाले, दर एक लाख लोकसंख्येमध्ये एकाचे फुफ्फुस आकुंचन पावते, असे वैद्यकशास्त्रातील आकडेवारी म्हणते. देशाच्या लोकसंख्येची सरासरी काढली तर आजघडीला सात लाख व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे आजच्या तरुणांमध्ये धूम्रपानाची संख्या वाढत आहे. हे धूम्रपान फुफ्फुसांच्या आकुंचनाची जोखीम वाढविते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस’ (आयपीएफ) म्हटले जाते. हा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. त्यामुळे फुफ्फुस आकुंचन पावून शरीराला आॅक्सिजन पुरविण्याची गती मंदावते. कालांतराने फुफ्फुसांवर ओरखडे वाढून गाठी तयार होतात. त्यामुळे फुफ्फुस शरीराला आॅक्सिजन पुरवू शकत नाही. दुर्दैवाने आकुंचन पावणाºया फुफ्फुसांची गती मंद करण्यापलीकडे या आजारावर वैद्यकशास्त्रात कोणतेही रामबाण औषध नाही. पूर्वी या आजारावर स्टेरॉईड दिले जायचे, परंतु आता नवीन औषधे उपलब्ध झाली असून त्याचा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्य