शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या तज्ज्ञांनी घेतला नागपूरच्या कोविडचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:35 IST

‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.

ठळक मुद्देटेस्टिंग, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, रुग्णालय व रुग्णांचे व्यवस्थापन यावर भरसंक्रमण रोखण्यावर प्रदीर्घ चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, रुग्णालय आणि रुग्णाचे व्यवस्थापन यावर भर देत यासाठी दीर्घकालीन संघर्ष करण्याचा मंत्र मुंबईवरून आलेल्या तज्ज्ञ समितीने दिला. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅराथॉन बैठकीत नागपुरातील कोविडचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी तपासणी करणे, क्वारंटाईन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील झोननिहाय वॉर रूम तयार करून ‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल हे उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. या पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता.राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.बैठकीनंतर या पथकातील सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चहल म्हणाले की, आकडेवारीवरून परिस्थितीचे मूल्यांकन करू नये, घाबरू सुद्धा नये. हा संसर्ग कधी जाणार कुणीही दावा करू शकत नाही. त्यामुळे टेस्टिंग, अ‍ॅम्ब्युलन्स, रुग्णालय व रुग्णांचे व्यवस्थापन यावर भर द्यायला हवा. रुग्णांना खाटा उपलब्ध होत आहेत की नाही, यावर लक्ष असावे. त्यांच्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स आहे की नाही, हे सुद्धा पहावे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस