शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक

By admin | Updated: May 9, 2014 02:27 IST

बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले.

बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न नागपूर: बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले. या व्यवसायात ज्या बेरोजगारांमध्ये थोडेफार कौशल्य असेल त्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले.सर्वात अगोदर १४८३ बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करून त्यांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी १२८२ उमेदवारांची टेस्ट घेण्यात आली. ९१४ उमेदवारांची प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी ४२४ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यातून ३७२ बेरोजगारांना नोकरी उपलब्ध झाली. हा एक छोटेखानी प्रयत्न गडचिरोलीत यशस्वीपणे राबविण्यात आला. राज्य शासनानेसुद्धा याची गंभीरतेने दखल घेतली आहे. 'गडचिरोली पॅटर्न'च्या धर्तीवर हा प्रकल्प आता संपूर्ण राज्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या माध्यमातून नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सांगली आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासंबंधात लवकरच शासनातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

असा असेल 'कौशल्य विकास कार्यक्रम' ■ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष खासगी आस्थापनाद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे. गावपातळीवर जाऊन बेरोजगार तरुणांशी संपर्क साधणे, त्यांच्यातील व्यवसायाच्या दृष्टीने असलेल्या कौशल्याची माहिती करून घेणे. ते कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, याबाबत कौन्सिलिंग करणे, प्रशिक्षणाद्वारे त्याला नोकरीसाठी सक्षम करणे.