शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

जिल्ह्यातील कला-संस्कृतीचे एका मंचावर दर्शन

By admin | Updated: May 2, 2017 02:07 IST

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत सखी मंचतर्फे राज्यातील विविध शहरांत सखींच्या प्रतिभांना उजाळा मिळावा म्हणून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सखी महोत्सव : लोकमत सखी मंच, भोजवानी फूडस् व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सचे आयोजननागपूर : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत सखी मंचतर्फे राज्यातील विविध शहरांत सखींच्या प्रतिभांना उजाळा मिळावा म्हणून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कडीत सखी मंचतर्फे नुकतेच ग्रामीण क्षेत्रातील प्रतिभांना ‘जिल्हास्तरीय सखी महोत्सव-२०१७’साठी आमंत्रित केले होते. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, कोराडी, खापरखेडा, कामठी, येरखेडा, बेला, बुटीबोरी, उमरेड व नागपूर ग्रामीण या क्षेत्रातून आलेल्या लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी एकल नृत्य, एक अंकी नाटक, रांगोळी, गीतगायन, काव्यपाठ व समूह नृत्य स्पर्धेत उत्साहात सादरीकरण केले. लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् यांच्यावतीने आयोजित व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सद्वारा प्रायोजित ‘सखी महोत्सव २०१७’चे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. भोजवानी फूडस्चे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश भोजवानी व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सच्या नागपूर शाखेचे प्रमुख दिव्य खरे, परेश कुलकर्णी, स्नेहांचलच्या संचालिका डॉ. रोहिणी पाटील, गायिका सुरभी ढोमणे, समुपदेशक सना पंडित, प्रियल शहा, साहित्यकार डॉ. माणिक वड्याळकर, साहित्यिक डॉ. प्रज्ञा देशपांडे, शिक्षिका नीलिमा हिंगे, गुजराती महिला समाजाच्या चारू देसाई प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन संयोजिका नेहा जोशी यांनी केले. अ‍ॅटिट्यूड डिझाईन्स दिशा डुंभिरे यांचा सहयोग होता.(प्रतिनिधी)रॅलीद्वारे दिला सामाजिक संदेशसकाळी रॅली काढून सखी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सखींनी त्यांच्या विशेषतांचे भव्य सादरीकरण केले. यामध्ये ग्रंथदिंडी पथक, कोराडी देवीच्या चित्ररथात प्लास्टिक खाणारा राक्षस, सेनेचे जवान व नागपूरची वधू दर्शविणारे चित्ररथ आकर्षक ठरले.स्वाभिमान कार्यक्रमाची दिली माहितीयावेळी बिरला सनलाईफ इन्श्योरन्सचे शाखाप्रमुख दिव्य खरे यांनी बिरला सनलाईफ इन्श्योरन्सतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘स्वाभिमान कार्यक्रमा’बाबत माहिती दिली. गृहिणी, नोकरीपेशा किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला स्वाभिमान कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक रूपाने आत्मनिर्भर होऊ शकतात. स्वत: आत्मनिर्भर होऊन कुटुंबाचीही मदत करू शकतात. स्वाभिमान कार्यक्रमाशी जुळण्यास इच्छुक महिलांनी बिरला सनलाईफच्या धरमपेठ येथील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सखींना विविध प्रश्न विचारण्यात आले व योग्य उत्तर देणाऱ्यांना पुरस्कारही देण्यात आले.स्पर्धेचे निकालएकपात्री अभिनय स्पर्धा : प्रथम चित्रलेखा नखाते खापरखेडा, द्वितीय अनिता हलवे बुटीबोरी, तृतीय सुचिता अंचलवार येरखेडा, प्रोत्साहन- कल्पना कनोजे.गायन : प्रथम भावना गहूकर मोहपा, तृतीय कामिनी बंसोड नागपूर, प्रोत्साहन दीप्ती चरखे कोराडी.रैली : प्रथम कोराडी, द्वितीय खापरखेडा, तृतीय-येरखेडा.उत्कृष्ट संघ : प्रथम सावनेर, द्वितीय बुटीबोरी, तृतीय नरखेड, चौथा नागपूर. एकल नृत्य : प्रथम वैशाली वाघमारे, द्वितीय सरिता राघोर्ते, तृतीय शिवानी बन कोराडी, प्रोेत्साहन वर्षा श्रीवास्तव सावनेर.रांगोळी : प्रथम राधा अतकरी नागपूर, द्वितीय नीलिमा निस्ताने बेला, तृतीय - नंदा पाटील बुटीबोरी, प्रोत्साहन मनुश्री मारमाते कोराडी.स्वरचित कविता : प्रथम - रेवती काळे नरखेड, द्वितीय - अरुणा डांगोरे मोहपा, तृतीय वैशाली तळवेकर नागपूर, प्रोत्साहन विनया जोशी नागपूर. समूह नृत्य स्पर्धा : प्रथम ब्लॉसम ग्रुप नागपूर, द्वितीय आदिशक्ति ग्रुप नागपुर, तृतीय कोराडी आणि मोहपा ग्रुप विशेष ठरला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्यलोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधींनी भोजवानी फूडवर आधारित भव्य नाटिका सादर केली.सखींनी एकल नृत्य, एक अंकी अभिनय, रांगोळी, गीतगायन, काव्यपाठ व समूह नृत्य स्पर्धेत भाग घेतला. जिल्हाभरातून आलेल्या महिलांचा नागपुरातील असा पहिलाच कार्यक्रम ठरला.