शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीतील व्यायाम, कोरोनाला आमंत्रण : नागरिकांनी मॉर्निंग वॉकला एकत्र येणे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:30 IST

सकाळी उठून व्यायाम करणे हे कधीही हिताचेच असते व अनेकजण जर ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य देतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र गुरुवारी शहरातील अनेक ‘वॉकिंग स्ट्रीट’वर या आवाहनालाच नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देसिव्हील लाईन्समध्ये दिसून आली रीघ

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सकाळी उठून व्यायाम करणे हे कधीही हिताचेच असते व अनेकजण जर ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य देतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र गुरुवारी शहरातील अनेक ‘वॉकिंग स्ट्रीट’वर या आवाहनालाच नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र होते. सिव्हील लाईन्ससह काही भागात ‘मॉर्निंग वॉक’साठी लोकांची गर्दी झाली होती. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न होत असताना नागरिकांची अशी बेजबाबदारी आजाराला आमंत्रण देणारीच ठरू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.प्रशासनाने शहरातील ‘जिम्स’, उद्याने बंद केली आहे. शिवाय पश्चिम नागपुरातील अनेक लोक ‘एलआयटी’मध्येदेखील सकाळी फिरायला जातात. मात्र तेथेदेखील विद्यापीठ प्रशासनाने ‘मॉर्निंग वॉक’ला काही दिवस मज्जाव केला आहे. अशा स्थितीत अनेकांनी थेट ‘सिव्हील लाईन्स’मधील हिरवळीचा भाग गाठला. एरवीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक जण खबरदारीदेखील घेताना दिसून आले नाही. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ समोरील मार्गावर तर जास्तच गर्दी दिसली. काही अतिउत्साही तरुणांनी चक्क रस्त्यावरच ‘पुश अप्स’ मारल्या. हे करत असताना एकमेकांपासून अंतर ठेवण्याचेदेखील त्यांना भान राहिले नाही. अशा पद्धतीचा व्यायाम हा तर ‘कोरोना’ला आमंत्रण देणाराच ठरू शकतो.प्रशासनाचे आवाहन गंभीरतेने घ्याजिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्याकडून वारंवार ‘कोरोना’पासून बचावासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे.नागरिकांनी जास्त गर्दी करू नये, बाहेर निघाल्यावर आवश्यक खबरदारी बाळगावी, एकमेकांपासून अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी, असे विविध माध्यमातून सांगण्यात येत आहे. ‘कोरोना’बाबत हे आवाहन सर्वांनीच गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे.घरीच करा व्यायामपुढील काही दिवस हे नागपूरकरांसाठी परीक्षेचे आहे. अशा स्थितीत ‘मॉर्निंग वॉक’साठी जाऊन एखाद्या जागी गर्दी करणे योग्य ठरणार नाही. यापेक्षा नागरिक घरीदेखील व्यायाम करू शकतात. विविध योगासने, व्यायामपद्धती इत्यादींचा वापर होऊ शकतो.इतरांप्रमाणे पुढाकार घ्याशहरातील ‘जिम्स’ बंद असल्याने दररोज व्यायाम करणाऱ्यांची काहिशी गैरसोय झाली आहे. परंतु ‘कोरोना’संदर्भात सामाजिक जबाबदारी समजत काही तरुणांनी घरीच व्यायामाचे ‘बेसिक’ साहित्य घेतले आहे. त्यांच्याप्रमाणे इतरांनीदेखील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर