शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

अस्वच्छतेतून मुक्ती हीच खरी देशसेवा

By admin | Updated: October 3, 2015 02:43 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न पाहिले होेते.

मनपा व भाजपचे स्वच्छता अभियान : उपस्थितांना दिली शपथनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न पाहिले होेते. त्यांनी भारत मातेची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता केली. परंतु आज भारतमातेला अस्वच्छेतून मुक्ती देणे हे आद्य कर्तव्य असून हीच खरी देशसेवा आहे, अशा आशयाची शपथ महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने संत्रामार्केट येथे शुक्रवारी उपस्थितांना दिली.शुक्रवारी गांधी जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी महापालिका व भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, महापालिकेतील सभापती संदीप जोशी, गिरीश देशमुख, जयश्री वाडीभस्मे, गोपाल बोहरे, देवेंद्र मेहर, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, अप्पर आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, एअर मार्शल जगजितसिंग, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर,डॉ. प्रदीप दासरवार,सहायक आयुक्त सुभाष जयदेव. झोनचे सहायक आयुुक्त आदींनी अभियानात सहभाग घेतला. महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये हे अभियान राबविण्यात आले. सकाळी ८ वाजता गोमती हॉटेल परिसरात अभियानाला प्रारंभ करण्यात आला. प्रवीण दटके, देवेंद्र मेहर , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, झोन सभापती शीतल घरत, चेतना टांक, प्रमोद पेंडके, अनिता वानखेडे, सुलोचना कावे आदी उपस्थित होते. त्यानंतर संत्रामार्केट परिसरात अभियान राबविण्यात आले. येथे दटके यांच्यासह सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, सुनील अग्रवाल आदींनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. रेल्वे स्टेशनच्या मागील भागातील कचरा मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गोळा केला. चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत शास्त्री ले-आऊ ट स्वावलंबीनगर, मिडल रिंगरोड खामला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गिरीश देशमुख, संदीप जोशी, गोपल बोहरे, प्रकाश तोतवाणी, संजय बोंडे, किशोर वानखेडे आदी उपस्थित होते. गांधीबाग झोन भागात ढीवरपुरा, जुनी मंगळवारी, मिशन शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. झोन सभापती प्रभा जगनाडे, राजेश घोडपागे, वंदना इंगोले, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम आदींनी सहभाग घेतला.हनुमाननगर झोन भागातील मेडिकल कॉलेजचा परिसर, सक्करदरा येथील महात्मा गांधी मार्केट, बुधवारी बाजार परिसरात अभियान राबविण्यात आले. राष्ट्रवादीचे गटनेते राजू नागुलवार, झोन सभापती सारिका नांदूरकर आदी उपस्थित होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. आशीनगर झोन भागात कामठी रोड, गुरुव्दारा, अशोक नगर चौकात अभियान राबविण्यात आले. आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.मंगळवारी झोन भागातील गोरेवाडा वस्ती परिसरात अभियान राबविण्यात आले. महापलिका व तिरपुडे समाज कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. नगरसेविका मीना तिडके, साधना बरडे, संगीता गिऱ्हे, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे आदींनी सहभाग घेतलाअभियानात प्रामुख्याने कार्यालयांची स्वच्छता, परिसराची साफसफाई, उद्यान, दवाखाने, सार्वजनिक स्वच्छतागृह, सुलभ शौचालय, पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. (प्रतिनिधी)