शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एम्प्रेस मॉलजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 01:17 IST

एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.एम्प्रेस मॉल जवळचा काही भाग निर्जन असून तेथे झाडेझुडपे वाढलेली आहेत. छत्तीसगड, बालाघाटमधून आलेल्या मजुरांच्या तेथे झोपड्या होत्या. तेथे काही मजूर राहत होते. लॉकडाऊन नंतर तेथून अनेक मजूर निघून गेले. सध्या त्या भागात काही गर्दुल्ले, मद्यपी रात्रीच्या वेळी जातात, असे सांगितले जाते.गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास एका व्यक्तीला तीव्र दुर्गंधी आल्यामुळे त्याने जवळ जाऊन बघितले असता मृतदेह पडून दिसला. त्याने ही माहिती बाजूच्या एका चौकीदाराला दिली. चौकीदाराने नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षाने गणेशपेठ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. मृत व्यक्तीचा एक हात आणि एक पाय गायब होता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जनावरांनी चावल्याच्या खुणा होत्या, असे पोलीस सांगतात. मोकाट श्वानांनी मृतदेहाची अशी अवस्था केली असावी, असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे. दरम्यान, तो कोण कुठला, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. आजूबाजूच्यांनी मृताबाबत कसलीही माहिती दिली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही, त्या व्यक्तीची हत्या केली की तो तिथे आजाराने मरण पावला, हे कळायला मार्ग नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यासंबंधाने गुन्ह्याचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती गणेशपेठचे ठाणेदार कुमरे यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूEmpress Mallएम्प्रेस मॉल