शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

असेही एक ‘सर्वसामान्य’ आमदार! ; आॅटोने गाठले आमदार निवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:12 IST

आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणत: आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र यामध्ये आपले ‘सर्वसामान्य’पण जपणारे आमदार आजही अपवादात्मक नजरेस पडतात.

ठळक मुद्देपोलिसांकडे करवून द्यावी लागली स्वत:ची ओळखफाईव्ह स्टारमध्ये नाही, आमदार निवासातच मुक्काम

गणेश खवसे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणत: आपल्या डोळ्यासमोर येते. त्यातच अलीकडे, आमदारांचा ‘स्मार्ट’ लूक ‘लय भारी’ आहे. स्मार्टफोन, काळा गॉगल, पांढरा कुर्ता-पायजामा असाच त्यांचा पेहराव असतो. मात्र यामध्ये आपले ‘सर्वसामान्य’पण जपणारे आमदार आजही अपवादात्मक नजरेस पडतात. त्यात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यात आणखी एक नाव जोडल्या गेले ते आमदार जे. पी. ऊर्फ जीवा पांडू गावित यांचे. अत्यंत साधी राहणी असलेले हे आमदार महाशय आमदार निवासाच्या इमारत क्र. १ मधील खोली क्र. १६ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुक्कामी आहेत.आ. जीवा गावित हे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. १९७८ पासून ते आमदार असून त्यात केवळ १९९५ चा अपवाद आहे. ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे पाहिल्यास ‘हा माणूस आमदार आहे’ असे कुणालाच वाटणार नाही, एवढी साधी राहणी गावित यांची आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ. गावित हे नागपुरात दाखल झाले आहेत. आमदार निवासाकडे आमदार पाठ फिरवित असल्याचे चित्र असताना हे ज्येष्ठ आमदार मात्र आपल्या परंपरेप्रमाणे आमदार निवासातच मुक्कामाला आहे. त्यांच्यासोबत सध्या त्यांचे कुटुंबीयही आलेले आहे.मी आमदार आहे!सोमवारी (दि. ११) हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर आ. जीवा गावित हे आॅटोने आमदार निवासापर्यंत आले. परंतु प्रवेशद्वारावरच सुरक्षा व्यवस्था म्हणून आॅटो थांबविला. आत जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगताच ‘मी आमदार आहे’ असे आ. गावित यांना सांगावे लागले. यावरून त्यांची राहणी, साधेपणा दिसून येतो. विशेष बाब अशी की, २०१४ मध्ये त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला. त्यांच्यारुपाने  विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्याला हा मान मिळाला. एवढे नाव असूनही त्यांचे राहणीमान ‘सर्वसामान्य’ आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७