शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

परीक्षा तोंडावर, पुस्तके पार्सल विभागात

By admin | Updated: December 1, 2015 07:11 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर असताना, विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळणारी पुस्तके एसटी

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर असताना, विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळणारी पुस्तके एसटी महामंडळाच्या पार्सल विभागात पडलेली आहेत. पुस्तके पार्सल विभागात पडली असल्याची माहिती महाविद्यालयांना असूनसुद्धा महाविद्यालयाच्या बोर्डवर पुस्तके घरपोच येतील, पुस्तकासंदर्भात विचारणा करू नये अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. परीक्षा लवकरच असल्याने पुस्तकासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. एसटी महामंडळाच्या पार्सल विभागात जवळपास १५ ते २० हजार बीए, बीकॉम विषयाची पुस्तके पडलेली आहेत. काही विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाल्याने, विद्यार्थ्यांनी पार्सल विभागाशी संपर्क साधला. पुस्तकासाठी त्यांना आधार कार्ड व विद्यापीठाकडून पाठविलेला एसएमएस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना एसएमएस मिळाला नसल्याने, पार्सल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुस्तक देण्यास असमर्थता दर्शविली. विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळावी म्हणून संबंधित महाविद्यालयात संपर्क साधला असता, पुस्तकासंदर्भात विचारणा करू नका अशा सूचना महाविद्यालयात लावून ठेवल्या. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने एसएमएस केला, त्या विद्यार्थ्यांनाही पुस्तके मिळविण्यासाठी त्रास होत आहे. पार्सल कार्यालयातील कर्मचारी हा विद्यापीठाशी संबंधित नसल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च पुस्तके शोधावी लागत आहे. यामुळे पुस्तके हरविण्याचीही शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. यासंदर्भात महाविद्यालयात संपर्क साधला असता, यापूर्वी पुस्तके विद्यापीठातर्फे केंद्रावर पोहचविली जायची. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके उपलब्ध होईल, अशा सूचना विद्यापीठाकडून आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून आम्हाला पुस्तकांसंदर्भात विचारणा होत आहे, आम्ही त्यांना घरपोच पुस्तके उपलब्ध होईल, असे सांगत आहोत. दोन महिन्यापासून ही पुस्तके पार्सल विभागात पडलेली आहे. विद्यार्थ्यांची पुस्तकासाठी ओरड होत असताना, त्यांना पुस्तके का मिळत नाही, याची साधी दखलही विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली नाही. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पुस्तके येथे पडलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके एसटीच्या पार्सल विभागात पडलेली असल्याची माहिती मिळाली, त्यांनी पार्सल विभागातून पुस्तके मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एसएमएस आणि आधारकार्डशिवाय पुस्तके देण्यास असमर्थता दर्शविल्याने, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.विद्यापीठाचा कुरिअर कंपनीशी करार४यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील भांडार अधीक्षक थोरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, विद्यापीठाने अंकल पार्सल या कंपनीशी करार केला आहे. करारानुसार पार्सल कंपनीने विद्यार्थ्यांना पुस्तके घरपोच उपलब्ध करून द्यायची आहे. आम्ही कुरिअर कंपनीच्या संपर्कात आहोत, लवकरच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके मिळतील.