शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाइलवरून देता येईल परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:38 IST

नागपूर विद्यापीठाचे अ‍ॅप; राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हे त्यांच्या मोबाइलवरूनदेखील परीक्षा देऊ शकणार आहेत. यासाठी विद्यापीठाने आरटीएमएनयू परीक्षा हे विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.या माध्यमातून ते एक तासात सर्व प्रश्न सोडवू शकतील. विशेष म्हणजे राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. १ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा होणार आहे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी गेली तरी विद्यार्थी पेपर सोडवू शकतील. केवळ पेपर सबमिट करताना इंटरनेट असणे आवश्यक राहणार आहे. एका तासानंतर पेपर सोडवू शकणार नाहीत.विद्यापीठाने घेतली चाचणी : नागपूर विद्यापीठाने या मोबाइल अ‍ॅपची चाचणीदेखील घेतली आहे. चारही जिल्ह्यांतील दुर्गम भागातदेखील चाचपणी झाली व अ‍ॅप कमी इंटरनेट रेंजमध्येदेखील काम करू शकत असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे माहिती येईल व त्यांची नावे शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :examपरीक्षा