शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 21:04 IST

ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते.

ठळक मुद्देइंडिया अगेन्स्ट ईव्हीएमचा आरोप : मतदान बॅलेट पेपरवरच व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर होणारे प्रात्यक्षिक केवळ देखावा असतो, असा आरोप इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमअंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय जनआंदोलनाच्या आयोजकांनी सोमवारी नागपुरात केला.प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार राजू तिमांडे, फिरोज मिठीबोरवाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, ज्योती बढेकर आदी उपस्थित होते.फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ईव्हीएम हा देशात फॅसिस्ट राजवट आणण्याचा मार्ग आहे. राजसत्ता व कॉर्पोरेट शक्तींनी निवडणूक आयोगाला बाहुले बनविले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी होऊनही कसलीही दखल घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅटला विचारातच घेतलेले नाही, तरीही सरकार हा देखावा का करीत आहे. २० लाख ईव्हीएम मशीन्स गायब आहेत, हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्यांना कारागृहात टाकले जाते, या दडपशाहीचे उत्तर सरकारने द्यावे.ईव्हीएमविरोधात तक्रारी असणाऱ्यांना तसेच सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोागने पाचारण केले असता आपण का गेला नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, आयोग मशीनला हातही लावू देत नाही. त्यामुळे तिथे जाण्यात अर्थ नव्हता. आमची याचिका न्यायालयात दाखल आहे. न्यायालयानेच यावर निर्णय द्यावा.प्रशांत पवार म्हणाले, कुणालाही मतदान केले तरी त्यांनाच जातात. कुणाचाही ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या अभियानातून जनजागृती केली जात आहे. १४ सप्टेंबरला देशात ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय उठाव आहे. त्याआधीच सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा जनउद्रेक वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. अन्य नेत्यांनीही यावेळी हीच मागणी केली.ईव्हीएम हॅक करून दाखविण्याचा दावा फोलईव्हीएम मशीन हॅक करण्याचे प्रात्यक्षिक माध्यमांसमोर करण्याचे आयोजकांनी जाहीर केले. प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. आयोजकांकडे मशीनही नव्हती. यासंदर्भात विचारणा केली असता, ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, त्यांच्या पक्षाची महत्त्वाची बैठक असल्याने ते येऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण फिरोज मिठीबोरवाला यांनी केले. आयोजक प्रशांत पवार यांनीही हेच कारण सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनMediaमाध्यमे