शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात सर्वजण अस्वस्थ

By admin | Updated: April 11, 2016 03:04 IST

अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी...

नितीन गडकरींचा नेम : न्यायदानातील विलंबावर खंतनागपूर : अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधला. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित ‘जस्टिसिया’ परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ही तीन दिवसीय परिषद डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडली. कार्यक्रमात गडकरी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राजकारणात कोणीही समाधान मानायला तयार नाही. यामुळे अस्वस्थता सतत वाढत आहे. नगरसेवक आमदारासाठी तिकीट मिळाली नाही म्हणून, आमदार मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, मंत्री चांगले खाते मिळाले नाही म्हणून तर, चांगले खाते मिळणारे मुख्यमंत्री झालो नाही म्हणून अस्वस्थ होतात, असे गडकरी म्हणाले. याशिवाय गडकरी यांनी न्यायदानात होत असलेल्या विलंबावर खंत व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर आजही लोकांचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था बदलत आहे. पारदर्शकता वाढत आहे. परंतु पक्षकारांना वेगात न्याय मिळाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नागपुरातील वकिली क्षेत्राला श्रीमंत परंपरा लाभली आहे. येथे कोणीही जात व धर्माच्या नावावर भेदभाव करीत नाही. नवोदित वकील चुकत असल्यास तो कोणत्याही जातीधर्मातील असो ज्येष्ठ वकील त्याला कान धरून योग्य मार्गावर आणतात, असे सिरपूरकर यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी स्पर्धा अपिलीय न्यायाधिकरणात नागपुरातील एकही वकील व्यवसाय करीत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. नागपुरातील वकिलांनी आता दिवाणी, औद्योगिक व फौजदारी प्रकरणाच्या बाहेर पडून स्वत:च्या कक्षा विस्तारण्याची वेळ आली आहे. हा काळ ‘कॉर्पोरेट प्रॅक्टिस’चा आहे, असे मत व्यक्त करून यासाठी वकिलांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी सिरपूरकर यांनी दर्शविली. न्या. गवई यांनी ही परिषद एक ज्ञानयज्ञ होती असे मत व्यक्त केले तर, न्या. धर्माधिकारी यांनी खरी वकिली न्यायालयातच शिकता येते, असे सांगितले. व्यासपीठावर परिषदेचे संयोजक अ‍ॅड. उदय डबले, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल व सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते.याप्रसंगी नवनियुक्त प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)