शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनीच केली मौजमस्ती

By admin | Updated: June 17, 2016 03:09 IST

वृषभ अरुण सेलोटकर (२१, रा. न्यू सुभेदार ले आऊट, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव भापकर, रा. नागपूर याचा बुधवारी वाढदिवस होता.

‘बर्थ डे’ पार्टी बेतली जीवावर नागपूर : वृषभ अरुण सेलोटकर (२१, रा. न्यू सुभेदार ले आऊट, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव भापकर, रा. नागपूर याचा बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे वैभव, वृषभ व त्यांचे अन्य १० मित्र बर्थ डे पार्टी साजरी करण्यासाठी बुधवारी दुपारी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळ गेले होते. त्यांनी सोबत जेवण तयार करण्याचे साहित्यदेखील नेले होते. सुरुवातीला या सर्वांनी मौजमस्ती केली. जेवण तयार झाल्यानंतर वैभवने सर्वांना जेवण करण्याची विनंती केली. त्यातच काही मित्रांनी आधी आंघोळ करून नंतर जेवण करू, अशी आग्रही भूमिका घेतली. दरम्यान, वृषभसह अन्य पाचजण तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले. काठावर बसलेला एक मित्र त्यांचे मोबाईलने फोटो घेत होता. काही वेळातच वृषभ खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी पाण्याबाहेर पळ काढला आणि वृषभ पाहता-पाहता पाण्यात दिसेनासा झाला. यातील एका मित्राने सदर घटनेची सूचना हिंगणा पोलिसांना दिली. पोलीस रात्री ७ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृषभचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अंधारामुळे वृषभला शोधण्यात यश आले नाही. परिणामी, गुरुवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास वृषभचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर वृषभचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल संजय बतखळ करीत आहेत. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)