शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

दरवर्षी ६० लाख लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू

By admin | Updated: May 30, 2016 02:13 IST

जगभरात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडतात.

सुशील मानधनिया : २०३० पर्यंत हा आकडा तिपटीने वाढण्याची भीतीनागपूर : जगभरात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडतात. युरोपीय देशांमध्ये सिगारेटमुळे दगावणाऱ्यांची संख्या ही टीबी, हृदयरोगापेक्षाही मोठी आहे. भारताचा विचार करायचा तर देशात दरवर्षी ७ लाख लोक तंबाखूमुळे दगावतात. आपल्याकडे तंबाखूमुळे घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, मुखाच्या कर्करोगामुळे दगावणाऱ्यांची संख्या अन्य कर्करोगाने दगावणाऱ्यांच्या तुलनेत ८० पटीने अधिक आहे. तंबाखूमुळे ५ लाख ५० हजार पुरुष अकाली प्राण गमावतात. या तुलनेत महिलांची संख्या ही १ लाख १० हजार आहे, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी येथे दिली.३१ मे हा दिवस जगभर तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. डॉ. मानधनिया म्हणाले, धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात राहणारे १ लाख नागरिक देखील आयुष्यात कधीही व्यसन न केल्याने दगावतात. हृदयरोग, टीबीच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटीने अधिक आहे. सरासरीने विचार केला तर देशात अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० टक्के हे कर्करोगाचे बळी आहेत. टीबीचा यातला वाटा ३० टक्के आहे. २०३० पर्यंत हा आकडा तिपटीने वाढण्याची भीती आहे.(प्रतिनिधी)कर्करोगावरील उपचारावर खर्च होतो १६ हजार ८०० कोटी देशात दरवर्षी तंबाखूमुळे १ लाख ४ हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यापैकी १६ हजार ८०० कोटी रुपये हे केवळ त्यामुळे होणाऱ्या कर्करोगावरच्या उपचारावर खर्च होतात. यातून होणारी आर्थिक हानी लक्ष वेधणारी आहे. सरासरी लोकसंख्येचा विचार केला तर देशातील २७ कोटी ५० लाख जनता तंबाखूचे सेवन करते तर १६ कोटी ५० लाख लोक हे सिगारेट, बिडी ओढतात. दोन्ही व्यसने असणाऱ्यांचे प्रमाण हे साडेसात कोटी आहे. त्यामुळे सामान्यपणे दगावणाऱ्यांपेक्षा कर्करोगाची जोखीम ही ६० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे हृदयरोग, कर्करोग, श्वसनाचे विकारांनी दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.