शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:15 IST

तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जीभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच. अनैच्छिक धूम्रपानामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) ३५ टक्के लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्या निरीक्षणात आढळून आले आहे. यामुळे तंबाखूविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे१०० मधून ३३ जणांना कॅन्सरचा धोका : अनैच्छिक धूम्रपानामुळे ३५ टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जीभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच. अनैच्छिक धूम्रपानामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) ३५ टक्के लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्या निरीक्षणात आढळून आले आहे. यामुळे तंबाखूविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्यावतीने पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरवर प्रकाश टाकला. रुग्णालयाचे संचालक डॉ. सुभ्रजित दासगुप्ता म्हणाले, ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) २०२० पर्यंत भारतात कर्करोगाचे १७ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येण्याचे व यातील आठ लाख रुग्णांचा मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. देशात तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते सेवन आणि वाढते धूम्रपान हे त्याचे प्रमुख कारण ठरणार आहे.चार वर्षांत ६५३ फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण-डॉ. दासगुप्ताडॉ. दासगुप्ता म्हणाले, रुग्णालयात २०१४ ते २०१८ या कालावधीत ६५३ फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांचा इतिहास पाहिला तर ३५ टक्के रुग्ण हे स्वत: धूम्रपान करीत नव्हते, परंतु ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ व प्रदूषणामुळे त्यांना कॅन्सर झाल्याचे सामोर आले आहे.तरुणींमध्ये वाढतेय धूम्रपान-डॉ. शर्मारुग्णालयाचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा म्हणाले, तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ३० ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे धक्कादायक आहे. सोबत ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तरुणींमध्ये धूम्रपानाचे व्यसन वाढत आहे. सध्या पुरुष आणि महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ८० आणि २० आढळते, परंतु पुढे ही संख्या शहरात लवकरच समसमान होण्याची शक्यता आहे.वेदना, सूज व गाठीकडे लक्ष द्या-डॉ. सप्रेडॉ. एस.बी.सप्रे म्हणाले, मान, चेहरा व घसा यामध्ये जास्त वेदना, सूज किंवा गाठी असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दीर्घकाळ बरा न होणारा खोकला, आवाजातील बदल, तोंडात, घशात लाल किंवा पांढरे चट्टे यापैकी कोणतेही एक लक्षण तीन आठवडे दिसत असल्यास तो घसा व तोंडाचा कर्करोग असू शकतो.

टॅग्स :anti gutka campaignगुटखाविरोधी मोहीमcancerकर्करोग