शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दररोज पाच हजारांवर गरजूंची भागतेय भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:40 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचविणे सुरू आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत केंद्रात बसून भोजन करणे बंद आहे. मात्र तरीदेखील प्रकल्पाचा सेवाभाव कायम आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचविणे सुरू आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया गरीब रुग्णांचे नातेवाईक भूक मारून राहायचे. त्यांची समस्या लक्षात घेऊन महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून परिसरात दीनदयाल थाली केंद्र सुरू झाले. शहरातील अनेक दानदात्यांचेदेखील सहकार्य लाभले. कोरोनाच्या संकटाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याने या केंद्रात बसून जेवणाची सोय बंद करण्यात आली आहे. परंतु या माध्यमातून शहरातील गरीब नागरिकांची नियमित सेवा सुरू आहे.या केंद्रात दररोज पाच हजारांहून अधिक नागरिकांसाठी भोजन तयार करण्यात येते. त्यानंतर सुमारे हजार लोकांच्या भोजनाचे केंद्रातच पॅकिंग होते व शहरातील गरजूंपर्यंत त्यांचे वितरण करण्यात येते. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता राखण्यावर विशेष भर असतो. शहरातील विविध भागातील नगरसेवकांच्या माध्यमातून वितरणाचे कार्य करण्यात येत आहे. उर्वरित चार हजारांहून अधिक लोकांचे जेवण नगरसेवकांना पोहचविण्यात येते. त्यांना पॅकिंगचे साहित्यदेखील पुरविण्यात येते. नगरसेवक या भोजनाचे पॅकिंग करून मग गरजूंपर्यंत पोहचवितात. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठीदेखील हे फूड पॅकेट्स उपलब्ध आहेत. शहरात शिकणाºया विद्यार्थ्यांसाठीदेखील केंद्रातून दररोज फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेचा महापौर स्वत: नियमितपणे आढावा घेत आहेत.दानदात्यांची मदतगरजूंचे पोट भरण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकल्पाला शहरातील दानदात्यांचीदेखील साथ मिळते आहे. काही जण निधीच्या माध्यमातून मदत करत आहेत. तर बरेच जण थेट शिधा किंवा भाजीपाला आणून देत आहेत. काही जण वितरणासाठीदेखील पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न