शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी : संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:54 IST

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले.

ठळक मुद्देसामाजिक न्याय दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले.दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, जिल्ह्यातील सामाजिक विकास शक्तीप्रदत्त समिती, समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, सहायक आयुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकेत सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. संचालन प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे यांनी केले.आंतरजातीय विवाह करणारे जोडपे सन्मानित 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना तसेच शाळेतून, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारा’च्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच रमाई घरकुल योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना तिसºया हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय, नागपूरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘परिवर्तन’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSocialसामाजिक