शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रणवने गाठले माऊंट एव्हरेस्ट, 14 गिर्यारोहकांच्या चमूची अतुलनीय कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:02 IST

नागपूरच्या प्रणव बांडबुचे या युवा गिर्यारोहकासह 14 जणांच्या चमूने सोमवारी सकाळी 8,300 मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत अतुलनीय कामगिरी केली आहे. 

नागपूरः नागपूरच्या प्रणव बांडबुचे या युवा गिर्यारोहकासह 14 जणांच्या चमूने सोमवारी सकाळी 8,300 मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत अतुलनीय कामगिरी केली आहे. इमॅजिन नेपाळ ट्रेकचे व्यवस्थापकीय संचालक मिनग्मा ग्यालजे शेर्पा यांच्या मार्गदर्शनात सात गिर्यारोहक आणि सात शेर्पाची चमू माऊंट एव्हरेस्टवर सोमवारी सकाळी पोहोचली.या चमूत प्रणव बांडबुचे हा एकमेव भारतीय गिर्यारोहक होता. त्याच्यासोबत ग्रीसचे फ्लॅमपौरी ख्रितिना व आर्कोन्टीदो वासिलिकि, चिनचे जिया लिन चांग, लियू याँगझाँग, वँग झ्यू फेंग आणि झेंग हूयी वेन, किली पेम्बा शेर्पा, दावा तेनझीन शेर्पा, टॅमटींग शेर्पा, लक्पा तमंग, दावा ग्यालजे शेर्पा, फुर्बा छोतर शेर्पा आणि देंडी शेर्पा यांचा समावेश होता. किली पेंम्बा व आर्कोन्टीदो वासिलिकि हे दोघे समीट पॉइंटला सकाळी ८ वाजता पोहोचले तर उर्वरित सर्वांनी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी माऊंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर सर्वच गिर्यारोहक कॅम्प 4 कडे रवाना झाले.

सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेचा सदस्य असलेला प्रणव हा विदर्भातला युवा गिर्यारोहक असून अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीअरिंग ॲण्ड अलाइड स्पोर्टस येथून त्याने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असे हनुमान तिब्बा हे शिखर पार करणारा प्रणय हा पहिलाच नागपूरकर आहे. माऊंट देव तिब्बा, माऊंट शितीधर आणि युरोपातील सर्वाधिक उंच शिखर माऊंट एल्ब्रसवर देखील त्याने भारताचे निशाण फडकावले आहे.
प्रणय सायकलिंगची देखील आवड आहे. त्याने २०० आणि ३०० किलोमीटरची ब्रेव्हेटदेखील पूर्ण केली आहे. एव्हरेस्ट मोहिमे साठी लागणारी शारीरिक तयारी त्याने डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली केली.कुटूंबात आई व लहान भाऊ, बहीण असलेल्या प्रणवचे कुटुंब शेतकरी आहे. इमॅजिन नेपालची चमू सोमवारी माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली चमू ठरली, असे बेस कॅम्पचे लायसग्यानेंद्र श्रेष्ठा यांनी कळविले आहे. माऊंट एव्हरेस्ट समीटचा मार्ग पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी खुला राहणार असून सुमारे दोनशे गिर्यारोहक या काळात माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट