शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘मेयो’ला आली जाग : अत्याचारपीडितेच्या उपचारांच्या खर्चाची भरपाई देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:14 IST

अत्याचारपीडित गरीब मुलीच्या कुटुंबीयांना दुसरीकडे उपचारासाठी पैसे मोजण्यासह बाहेरून औषधे आणायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मेयो’ इस्पितळाचे प्रशासन चांगलेच हादरले. अत्याचारपीडितेच्या उपचारांवर झालेल्या सर्व खर्चाची भरपाई देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देउपचारांत कुठलीही कसूर होणार नसल्याचा दावाप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्याचारपीडित गरीब मुलीच्या कुटुंबीयांना दुसरीकडे उपचारासाठी पैसे मोजण्यासह बाहेरून औषधे आणायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मेयो’ इस्पितळाचे प्रशासन चांगलेच हादरले. अत्याचारपीडितेच्या उपचारांवर झालेल्या सर्व खर्चाची भरपाई देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केले होते.आर्थिक स्थिती नसताना अत्याचारपीडित मुलीवर उपचाराचे पैसे जमा करताना कुटुंबाला मोठ्या अडचणीतून जावे लागले.नातेवाईकांनी रुग्णालयाने एमआरआय व अल्ट्रासाऊंड पैसे भरल्यावर उपचार केले गेले. पीडित मुलीला नि:शुल्क उपचार मिळायला हवेत. मात्र ‘मेयो’ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी ‘मेयो’तील अधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अधिष्ठात्यांनी आम्हाला येऊन सर्व खर्चाची देयके सादर करण्यास सांगितले. हे सर्व पैसे परत करण्यात येतील, असे आश्वासन आम्हाला दिल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.याबाबत ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना संपर्क केला असता, यापुढे पीडितेला सर्व औषधे वॉर्डातच देण्यात येतील. या मुलीला मोफत औषधोपचार मिळत होते. परंतु शनिवार-रविवार असल्यामुळे वॉर्डामध्ये ‘ज्युनिअर’ डॉक्टर उपस्थित होते. त्यांना नियमावलीचा विसर पडला असावा. त्यामुळेच या दोन दिवसात औषधांचे पैसे भरावे लागले. मात्र संबंधित औषधे फारशी महाग नव्हती. भविष्यात अशाप्रकारची घटना होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.मात्र अधिष्ठात्यांचा हा दावा कुटुंबातील एका सदस्याने खोडून काढला. आम्हाला पहिल्या दिवसापासून ‘मेयो’तील कर्मचाऱ्यांनी बाहेरून औषधे आणायला लावली. उपचार मोफत आहेत हे सांगण्याची कुणीही तसदी घेतली नाही, असे त्यांनी म्हटले.प्रशासन माणुसकी दाखविणार का?मुलीचे पालक हे अशिक्षित आहेत व मुलीवर झालेल्या अन्यायामुळे ते हादरले आहेत. अशास्थितीत अनेक देयके त्यांच्याकडून हरविली आहेत. मात्र प्रशासनाकडे सर्व गोष्टींची नोंद आहे. अशास्थितीत प्रशासन त्यांना मदत करण्याची माणुसकी दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सुरक्षाव्यवस्था वाढविलीदरम्यान, संबंधित पीडितेला किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी अभ्यागत आल्याचे दिसून आले. ती मुलगी अजूनही मानसिक धक्क्यात आहे. तिला वेगळ्या वॉर्डात ठेवले तर तिला आणखी एकटे वाटेल. त्यामुळे तिला जनरल वॉर्डात ठेवण्यात आले आहे. आम्ही सुरक्षाव्यवस्थादेखील वाढविली आहे आणि तिच्या उपचारात कुठलीही कसूर होणार नाही, असे डॉ. केवलिया यांनी सांगितले.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर