शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागपुरातील शिक्षकाच्या आत्महत्ये प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 14:52 IST

विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआरोपी फरार : जरीपटका पोलिसांची शोधाशोध

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.संदीप उर्फ सोनू विरेंद्रनाथ विश्वास (वय ४२, रा. सूवर्णनगर, जरीपटका) असे आत्महत्या करणा-या शिक्षकाचे नाव आहे. ते पाचपावलीतील आवळेबाबू चौकात खासगी शिकवणी वर्ग चालवित होते. वर्गात मोबाईलवर चॅटिंग करणा-या एका विद्यार्थीनीला त्यांनी हटकले. ही माहिती कळाल्यानंतर ११ डिसेंबरला दुपारी आरोपी जामगडे आपल्या तीन साथीदारांसह शिकवणी वर्गात आला. विद्यार्थीनींसोबत अश्लिल वर्तन करतो, असा आरोप लावून जामगडे आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास यांना मारहाण केली. बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना ३ लाख, २७ हजारांची खंडणी मागितली. न दिल्यास ट्यूशन क्लासेस चालवू न देण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली. विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांसमोर झालेल्या अपमाणामुळे विश्वास व्यथित झाले. या अवस्थेत त्यांनी १२ डिसेंबरला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस चौकशीत विश्वास यांच्या आत्महत्येला आरोपी जामगडे आणि त्याचे तीन साथीदार कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक एस. बदोले यांनी जामगडेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलीसही दोषीविश्वास यांच्या मृत्यूला पाचपावलीतील चव्हाण नामक पोलीस अधिकारीही दोषी असल्याची चर्चा आहे. आत्महत्येच्या आदल्या सायंकाळी विश्वास पाचपावली ठाण्यात गेले होते. जामगडे आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण करून बदनामी केली. तो खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे सांगून विश्वास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ठाण्यात असलेल्या चव्हाण नामक पोलीस अधिका-याने त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट आरोपींना ठाण्यात बोलवून समेट घडवून आणण्यासाठी विश्वास यांच्यावर दडपण आणले. एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर उद्या या, असे म्हणत विश्वास यांना परत पाठविले. आरोपींना पोलिसांचे पाठबळ असल्याचे लक्षात आल्यामुळे विश्वास यांनी आत्महत्या केली. त्यामुळे चव्हाण हे सुद्धा त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होत असून, चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याTeacherशिक्षक