शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

जुळी बाळे असतानाही त्या माउलीने केले दुधाचे दान, आयएएस महिला अधिकाऱ्याचा समाजापुढे आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 11:11 IST

Mother: जन्मलेल्या बाळाच्या पोषणाबाबत दुधाची कमतरता भासू नये म्हणून काय करू अन् काय नको, अशी आईची अवस्था होते, परंतु एक माउली अशीही, जुळी अपत्ये जन्माला आल्यानंतरही तिने दुधाचे दान केले.

- सुमेध वाघमारे नागपूर : जन्मलेल्या बाळाच्या पोषणाबाबत दुधाची कमतरता भासू नये म्हणून काय करू अन् काय नको, अशी आईची अवस्था होते, परंतु एक माउली अशीही, जुळी अपत्ये जन्माला आल्यानंतरही तिने दुधाचे दान केले. त्यांचे दूध आजारी व कमी वजनाच्या बालकांसाठी अमृत ठरले. विशेष म्हणजे, ही माउली आयएएस अधिकारी आहे.मिताली सेठी असे त्या माउलीचे नाव. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व वनामतीच्या त्या संचालक आहेत. आईचे दूध हे अमृत मानले जाते. परंतु प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू, अनाथ बालके, कमी वजनाची किंवा विविध आजारामुळे स्तनपान शक्य नसल्याने नवजात बाळाला पावडरचे दूध देण्याची वेळ येते.  याची दखल सेठी यांनी घेतली. जुळ्या बाळांना पाजूनही उरलेले दूध डागा रुग्णालयाच्या ‘मातृ दुग्ध पेढी’ला दान करीत सामाजापुढे एक आदर्श ठेवला.

‘आयएएस’ अधिकारी मिताली सेठी यांनी ‘मातृ दुग्ध पेढी’साठी घेतलेला पुढाकार इतर स्तनदा मातांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे त्या या पेढीचा ‘ॲम्बॅसडर’सारख्याच आहेत. -डॉ. सीमा पारवेकर, अधीक्षक, डागा रुग्णालय

११०० एमएल दुधाचे केले दानमिताली सेठी म्हणाल्या, चंद्रपूर व मेळघाटमध्ये असताना ‘ब्रेस्ट फिडिंग’वर काम केले. प्रसूतीनंतर बाळाला दूध पाजल्यानंतरही ‘ब्रेस्ट पंप’च्या साहाय्याने दूध काढता येते आणि योग्य प्रक्रियेद्वारे ते साठवताही येते याची माहिती होती. नोव्हेंबर महिन्यात जुळे बाळ जन्माला आली. त्यांना दूध पुरण्यासाठी रोज १०० एमएल दूध साठविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु गरजेपेक्षा अधिक दूध येत होते. यामुळे अतिरिक्त दूध दान करण्याची कल्पना आली. डागा  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवे यांच्याशी संपर्क साधला. नंतर त्यांनीच पुढाकार घेऊन दुग्ध पेढीची भेट घडवून आणली. आणि ११०० मिलिलिटर दुधाचे दान केले

टॅग्स :milkदूधnagpurनागपूर