शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 6, 2023 12:27 IST

१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती.

राकेश घानोडे -नागपूर : प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसताना खाली पडून मृत्यू झाला म्हणून त्याच्या वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही. प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला. त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही, असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.  प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता, हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे. प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली, असे रेल्वेचे म्हणणे नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहीही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने सांगितले. दीपलक्ष्मी बांधे (५०) असे मृत प्रवाशाचे नाव होते.  न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली.

तिकिटाचा मुद्दाही रद्द प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते हा मुद्दाही न्यायालयाने खारीज केला. केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही. अपघातानंतर तिकीट हरवू शकते, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या -रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात, फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे, हिंसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेCourtन्यायालय