शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

५७ दिवसानंतरही नागपुरात पेट्रोलचे भाव ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:17 IST

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या बदलत्या दरानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढउतार करण्याचा नियम पेट्रोलियम मंत्रालयाने आणला. पण मंत्रालय आपल्याच नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष.लॉकडाऊननंतर रेल्वे, बस आणि विमान सेवांसह मालवाहतूकही थांबली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता विक्री ३० टक्क्यांवर आली आहे. त्यानंतरही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नाहीत. महागाई कमी करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, पण कंपन्या त्याचा फायदा ग्राहकांना होऊ देत नाहीत. २५ मार्चला पेट्रोलचे दर ७६.७८ रुपये तर डिझेल ६६.३६ रुपये होते. डिझेलमध्ये केवळ ४० पैशांची घट झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही सरकारने अबकारी करात वाढ करून आपली तिजोरी भरली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे.पंप संचालकांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे बाजारात भीतीचे वातावरण असून जागतिक स्तरावर मागणीत मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ३४.३२ डॉलर प्रति बॅरल होती. ३ फेबुवारीला कच्च्या तेलाचे दर ५५ डॉलर प्रति बॅरल, २७ मार्चला ५० डॉलर, १ एप्रिलला २५ डॉलर, २० ते २८ एप्रिलपर्यंत २० डॉलर आणि ११ मे रोजी ३०.९७ डॉलर होते. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये नागपूरसह संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत ७० टक्के घट झाली आहे. मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर विक्री थोडीफार वाढली. मे महिन्यात रेड झोन जिल्ह्यांची संख्या वाढल्याने आणि मालवाहतुकीत वाढ न झाल्याने पुढेही पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता नसल्याचे पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.तारीख    पेट्रोल      डिझेल१३ फेब्रु. ७८.०६     ६८.४३१२ मार्च ७६.३२    ६६.३७२२ मार्च ७५.७८  ६६.३६२५ मार्च ७६.७८  ६६.३६२२ मे    ७६.७८     ६६.७६

टॅग्स :Petrolपेट्रोलnagpurनागपूर