शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नागपुरात श्री गुरूनानक प्रकाशपर्वावर कलगीधर सत्संग मंडळातर्फे शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:40 IST

श्री गुरू नानकदेव यांच्या ५५०व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीने जरिपटका येथे शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्दे ‘ गुरू श्री ग्रंथ साहिब’च्या दर्शनासाठी उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री गुरू नानकदेव यांच्या ५५०व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीने जरिपटका येथे शोभायात्रा काढण्यात आली.विधिवत पुजनानंतर गुरू श्री ग्रंथ साहिबची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. यात्रेत अग्रस्थानी गुरू श्री ग्रंथ साहिबचा रथ होता. ग्रंथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. शोभायात्रेत श्री गुरू नानकदेव, श्री गुरू अंगददेव, श्री गुरू अमरदास, श्रीगुरू रामदास, श्री गुरू अरजनदेव, श्री गुरू हरगोविंद, श्री गुरू हरिराय साहिब, श्री गुरू हरिक्रिशनदेव, श्री गुरू तेगबहाद्दूर, श्री गुरू गोबिंदसिंग, माता भगवतीचे रथ होते. ढोलताशाच्या गजरात नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेचे संयोजक अधिवक्ता माधवदास ममतानी यांच्या नेतृत्त्वात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, एसीपी परशूराम, डीसीपी निलोत्पल, माजी आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, आरोग्य विभागचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक महेंद्र धनविजय, उदय भास्कर नायर, राजे मुधोजी भोसले, हेमंत गडकरी, जयप्रकाश गुप्ता, डॉ. विंकी रूघवानी, पीआय पराग पोटे, रमेश वानखेडे, किशोर ललवानी यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.ठिकठिकाणी झाला पुष्पवर्षाव शोभायात्रा दुपारी १ वाजता मंडळाच्या सभागृहातून निघाली. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकडून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. प्रसाद वितरण, रांगोळीने केलेल्या मार्गाचे सुशोभीकरण, स्वागत द्वार आणि जागोजागी करण्यात आलेल्या आतषबाजीने वातावरणात जल्लोष निर्माण झाला होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर