शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

इच्छामरणाने मरणासन्न रुग्णांची त्रासातून मुक्तता होईल; डॉक्टर सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:57 IST

इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.

ठळक मुद्देनागपुरातील डॉक्टरांनी दिल्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली कित्येक वर्षे इच्छामरणावर देशात चर्चा सुरू होती. अनेकांनी आता आम्हाला जगायचे नाही, औषधोपचार करायचे नाहीत असे म्हणत इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली होती. इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.

निर्णयात नीतीमत्ता राखली गेली पाहिजेवरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रामधील नीतिमत्तेलाही अलीकडे आव्हान दिले जात आहे आणि म्हणून त्या नीतिमत्तेच्या चौकटीत राहूनच यावर योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, अशिक्षित व दुर्लक्षित झालेला रुग्णही अगतिक झाल्यावर इच्छामरणाची मागणी करतो. यामुळे त्याला सर्व प्रकाराचे उपचार मिळाले का आणि मिळूनही तो मरणासन्न अवस्थेत दिवस काढत असेल तर नीतिमत्तेच्या चौकटीत राहून त्या पद्धतीचा निर्णय घ्यायला हरकत नाही.

मरणासन्न रुग्णासाठी योग्य निर्णयवरिष्ठ मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी म्हणाले, कोमातून निघून एखादा रुग्ण मरणासन्न अवस्थेत गेला असेल किंवा एखाद्या रुग्णावर जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होत नाही आणि तो वेदना सहन करीत दैनंदिन गोष्टींसाठी दुसऱ्यावर निर्भर असेल, त्याचा स्वत:चा शरीरावर ताबा नसेल या दोन्ही प्रकरणात इच्छामरणाचा मार्ग योग्य ठरू शकेल.

निर्णयाचा गैरवापर होऊ नयेइंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, प्रत्येक डॉक्टरच्या वैद्यकीय सेवेत एक तरी असे प्रकरण येते जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होणार नाही असे डॉक्टरांना समजते. अशा प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधोपचारांचे प्रमाण कमी करतात. पण, फक्त औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून या निर्णयाचा गैरवापर होऊ नये.

टॅग्स :Healthआरोग्यEuthanasiaइच्छामरण