शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ईटीपी, एसटीपी कागदावरच : मेयोला नऊ कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:36 IST

रुग्णालयातील जैविक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनेसोबतच रुग्णालयातील ‘एफल्युएंट ट्रीटमेंट प्लान्ट’ (ईटीपी) व ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’(एसटीपी)तीन महिन्यात सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. परंतु या प्रकल्पाला लागणारा नऊ कोटींचा निधीच मिळाला नाही. यामुळे तूर्तास तरी हे दोन्ही प्रकल्प कागदावरच आहेत.

ठळक मुद्देरुग्णालयातील मलनिस्सारण व सांडपाण्यावर होणार होती प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयातील जैविक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनेसोबतच रुग्णालयातील ‘एफल्युएंट ट्रीटमेंट प्लान्ट’ (ईटीपी) व ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’(एसटीपी)तीन महिन्यात सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. परंतु या प्रकल्पाला लागणारा नऊ कोटींचा निधीच मिळाला नाही. यामुळे तूर्तास तरी हे दोन्ही प्रकल्प कागदावरच आहेत.जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेला गंभीरतेने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना रुग्णालयांची पाहणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ८ एप्रिल २०१८ रोजी चव्हाण यांनी काही रुग्णालयांना भेटी देत मेयो, मेडिकलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या रुग्णालयात दर दिवसाला ५० किलोपेक्षा जास्त जैविक कचरा निघत असेल तिथे दोनवेळा कचऱ्यांची उचल करण्याचे निर्देश दिले. जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेला घेऊन कर्मचाऱ्यांपासून ते डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही केल्या. विशेष म्हणजे त्यांनी रुग्णालयाच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र (एसटीपी) आणि प्रयोगशाळा व शस्त्रक्रियागृह येथून निघणाऱ्या द्रव पदार्थांच्या म्हणजेच सांडपाण्याच्या निचऱ्यासाठीचे प्रक्रिया केंद्र (ईटीपी) स्थापन करण्याच्याही सूचना केल्या होत्या. या सर्व बाबी तपासणीसाठी तीन महिन्यानंतर आढावा घेतला जाईल. यात जैविक कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होत नसल्यास रुग्णालय प्रशासनातील संबंधित अधिकारी, कचरा उचलणारी कंपनी व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. याला गंभीरतेने घेत मेयोने जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले. यासाठी कर्मचारी, अटेंडंट, परिचारिका व डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. दिवसातून दोनवेळा कचऱ्याची उचल करणेही सुरू केले. यामुळे जैविक कचऱ्याची समस्या निकाली निघाली. हे करीत असताना मेयो प्रशासनाने ‘एसटीपी’ व ‘ईटीपी’साठी नऊ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर केला. तेथून हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात गेला. परंतु अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. मेयो प्रशासन याचा पाठपुरावा करीत आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. परंतु निधी मिळायला व प्रकल्प सुरू व्हायला आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. यामुळे तूर्तास तरी हा प्रकल्प कागदावरच आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर