शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात अतिउच्च दाब उपकेंद्रांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:52 IST

राज्याच्या महापारेषण कंपनीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभराच्या काळात राज्यात ७ नवीन अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारली असून अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांमध्ये १४६० एमव्हीएची क्षमता वाढविली आहे तसेच वर्षभरात ८७५ किमीच्या नव्या वाहिन्या उभारल्या.

ठळक मुद्दे८७५ किमीच्या नव्या वाहिन्या :महापारेषणचे महत्त्वाचे निर्णय

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्याच्या महापारेषण कंपनीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभराच्या काळात राज्यात ७ नवीन अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारली असून अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांमध्ये १४६० एमव्हीएची क्षमता वाढविली आहे तसेच वर्षभरात ८७५ किमीच्या नव्या वाहिन्या उभारल्या.मनोरा आणि तारांच्या खालील जमिनीचा मोबदला देण्याबाबतच्या धोरणाला शासनाने मंजुरी दिली. शेतकºयांना जमिनीचा मिळणाऱ्या मोबदल्यात आता वाढ करण्यात आली आहे. भारनियमन टाळण्यासाठी ट्रान्सफार्मर क्षमता वाढीच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. २०१७-१८ मध्ये २९ उपकेंद्रात २५२५ एमव्हीए क्षमतावाढीची कामे सुरू आहेत. वर्षभराच्या काळात १९ अतिउच्च दाब वाहिन्यांचे दुसरे परिपथ उभारण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उपकेंद्रांना नवीन पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहेत.अतिउच्च दाब वाहिन्यांचे ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी एचटीएलएस कंडक्टरचा वापर करून ५२० किमीच्या वाहिन्या उभारण्याच्या सहा योजनांना मंजुरी देण्यात आली. महावितरणला योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी २९८० एमव्हीआर क्षमतेची कपॅसिटर बँक उभारण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या कामांपैकी बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. तसेच वीजदाबाच्या योग्य नियमनासाठी महापारेषणने ४०० केव्ही उपकेंद्रांमध्ये १२५ एमव्हीएआर क्षमतेचे १२ शंट रिअ‍ॅक्टर उभारण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेचा खर्च १४० कोटी रुपये आहे.महापारेषणने इस्रोच्या सहकार्याने भौगोलिक माहिती प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे अस्तित्वात असलेली पारेषण उपकेंद्रे, मनोरे यांची माहिती एका क्लीकवर आॅनलाईन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन वाहिनी अथवा उपकेंद्र उभारतेवेळी सध्याची माहिती उपयुक्त ठरणार आहे.

 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर