शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:09 IST

देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : जनसंवादच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.सोमवारी त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगाच्या उत्पत्तीपासून ते मानवाच्या विकासापर्यंत आणि देशातील सध्याच्या परिस्थितीपर्यंत रोखठोक मते व्यक्त केली. यावेळी अमिताभ पावडे, नागेश चौधरी, डॉ. पी.एस. चंगोले उपस्थित होते.कसबे म्हणाले, चातुर्वर्ण्य व्यवस्था व महिलांच्या दास्यतेमुळेच या देशाचा इतिहास पराभवाचा, गुलामगिरीचा राहिलेला आहे. भारतावर अनेक राजांनी आक्रमण केले. राज्य केले. त्याचे कारण म्हणजे ही चातुर्वर्ण्यव्यवस्थाच आहे. कुणीही राज्य करावे, परंतु त्यांनी आमच्या या व्यवस्थेला धक्का लावू नये, असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज आले, तेव्हा त्यांनीही चातुर्वर्ण्यव्यवस्थेला धक्का लावू नये, अशीच अपेक्षा होती. परंतु इंग्रज हे आधुनिक विचारसरणीतून आलेले होते. त्यांना ही व्यवस्था मान्य नव्हती. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. महात्मा गांधीजींच्या रूपात एक नवीन विचारांचा सर्वांना घेऊन जाणारा नेता उदयास आला. तेव्हा आता आपली व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने आरएसएसची स्थापना झाली. म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्याशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पुढे देश स्वतंत्र झाला आणि संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणूनच आरएसएसला हे संविधान मान्य नाही. संविधान कसे कमकुवत होईल आणि पुन्हा चातुवर्ण्यव्यवस्था निर्माण करता येईल, यासाठीच ते काम करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. बबन नाखले यांनी केले. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. तर संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. देशात अराजक वातावरणसंविधानाच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही, तर एक दिवस लोक संविधान नष्ट करून फॅसिझम आणतील, अशी भीती संविधाननिर्मात्यांनी तेव्हाच वर्तविली होती. तशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम आरएसएस करीत आहे. त्यामुळे देशात अराजक वातावरण निर्माण झाले आहे. देशाला वाचवायचे असेल तर शेतक ऱ्यांना केंद्र स्थानी माणून धोरण ठरवण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची गरज आहे, असेही रावसाहेब कसबे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ