शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:32 IST

नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले.जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे उत्पादक, ऑक्सिजन निर्मिती होत असलेले सर्व कारखाने,ऑक्सिजनचे मोठे पुरवठादार,या सर्वांशी ही समिती समन्वय ठेवणार आहे. या समितीमार्फत जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता, पुरवठा व संनियंत्रणाचे कार्य पार पाडले जाणार आहे. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता येणार आहे.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. या समितीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य राहतील. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे सहायक आयुक्त काम पाहतील. कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हास्तरावर ही समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर